(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथचे नवविवाहित जोडपे सध्या चर्चेत आहे. लोकप्रिय अभिनेते नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे एकमेकांसह लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या दोघांच्या सार्वजनिक कार्यक्रमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे आता लोकांची प्रतीक्षा संपली आहे. नागा आणि शोभिता लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अभिनेत्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न केले. लग्नानंतर शुक्रवारी (6 डिसेंबर) नवविवाहित जोडप्याने पहिल्यांदाच सार्वजनिक चाहत्यांच्या समोर आले. पती-पत्नी म्हणून त्यांच्या नवीन प्रवासासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे जोडपं आंध्र प्रदेशातील श्री भ्रमरंबा समेथा मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम मंदिरात पोहोचले. या जोडप्याचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
नागा-शोभिता मंदिरात पोहचले एकत्र
नवविवाहित जोडप्याने मंदिराबाहेर पापाराझी कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. चैतन्य आणि शोभिता यांच्यासोबत नागाचे वडील, ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन अक्किनेनी देखील उपस्थितीत होते. नागार्जुनने नवविवाहित जोडप्यासाठी आनंद आणि आशीर्वाद व्यक्त करत, मनापासून कॅप्शनसह लग्नातील पहिले अधिकृत फोटो शेअर केले होते. त्यांनी लिहिले की, ‘शोभिता आणि चैतन्य यांना या सुंदर अध्यायाची सुरुवात करताना पाहणे हा माझ्यासाठी खास आणि भावनिक क्षण आहे.’ असे त्यांनी लिहिले होते.
Pragya Nagra: मल्याळम अभिनेत्री प्रज्ञा नागराचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
नागा चैतन्यचे दुसरे लग्न
नागा चैतन्य आणि शोभिता यांनी अद्याप त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला, या जोडप्याने हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये नागाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांच्या घरी लग्न केले. चैतन्यचे पहिले लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत झाले होते. मात्र, ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनीही विभक्त होण्याची घोषणा केली आणि वेगळे झाले.