‘स्त्री 2’ मधल्या तमन्ना भाटिया हिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आज की रात’ या ट्रॅकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. पण तुम्हाला माहित आहे का या अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी हे गाणे 5 डिग्री तापमानात शूट केले होते? होय तुम्ही ते बरोबर वाचले नुकत्याच एका मुलाखतीत कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी खुलासा केला की अत्यंत वेगळ्या वातावरणात गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.
निर्मात्यांनी स्त्री 2 चित्रपटातील पहिल्या गाण्याचे अनावरण केले ज्याचे शीर्षक आहे ‘आज की रात’ ज्यामध्ये तमन्ना तिच्या नृत्याने चित्रपटातील हॉटनेस वाढवताना दिसतेय. सचिन-जिगर या डायनॅमिक जोडीने ते संगीतबद्ध केले आहे. विजय गांगुलीच्या अविश्वसनीय नृत्यदिग्दर्शनासह हे गाणं चर्चेत येतंय. सोशल मीडिया वर गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी तमन्नाच कौतुक केलं आहे.
गाण आणि शूटबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली “हे गाणे 5 डिग्रीच्या अतिशीत शूट केले गेले आहे हे आव्हानात्मक होत. पण सेटवर येताना खूप मज्जा आली. हे गाण खास आहे माझ्यासाठी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे गाणे शूट केले. मला वाटते की एखाद्या अभिनेत्याला मिळू शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे कामाचा वाढदिवस आहे आणि तो ‘स्त्री 2’ च्या उत्साही टीमसोबत साजरा करण ही गोष्ट खास आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून मला आनंद होत आहे. आता चित्रपटाला शुभेच्छा दिल्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील.” असे तिने सांगितले.
तमन्ना-स्टारर गाणं म्युझिक चार्ट्सवर ट्रेंड करत असताना हे सिद्ध झाले आहे की अभिनेत्री चित्रपट निर्मात्यांसाठी लकी चार्म म्हणून कशी उदयास येत आहे. १५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘स्त्री २’ मधल्या या गाण्याने गंमत वाढवली आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, श्रद्धा कपूर आणि इतर कलाकार असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. दरम्यान, तमन्नाचे चाहते अभिनेत्रीला ‘ओडेला 2’, ‘वेदा’ आणि ओटीटी प्रोजेक्ट ‘डेअरिंग पार्टनर्स’सह अनेक आगामी रिलीजमध्ये पाहण्याची वाट बघत आहेत.






