फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs South Africa 2nd Day : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसऱ्या दिवशी पहिला सेशन पार पडला. भारताच्या संघाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 159 धावांवर सर्वबाद केले होते. कालपासून भारताच्या संघ फलंदाजी करत आहे. दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 3 विकेट्स गमावले आहेत. झालेल्या सेशनमध्ये वाॅशिग्टन सुंदर याने विकेट गमावली. या सेशनमध्ये भारताच्या संघाने एक विकेट गमावला आहे. या सेशनमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारताच्या संघाने दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर ४ विकेट्स गमावून 138 धावा केल्या आहेत. सुरु असलेल्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल हा पहिल्याच दिनी बाद झाला होता. तर त्यानंतर सेशन समाप्तीआधी केएल राहुल बाद झाला आणि संघाने आज पहिल्याच सेशनमध्ये दोन विकेट्स गमावले. वाॅशिग्टन सुंदर 29 धावा केल्या आहेत, यामध्ये त्याने 1 षटकार आणि 2 चौकार मारले आहेत. केएल राहुल याने 39 धावांची खेळी खेळली आहे. यशस्वी जयस्वाल याने 12 धावा केल्या आणि विकेट गमावली होती.
Lunch on Day 2 🍲#TeamIndia trail South Africa by 2⃣1⃣ runs in the 1⃣st innings. Ravindra Jadeja and Dhruv Jurel will resume proceedings after the break. Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DNHwKzCAAB — BCCI (@BCCI) November 15, 2025
पहिल्या सेशन मध्ये वाॅशिग्टन सुंदर बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल हा फलंदाजी करण्यासाठी आला होता. हार्मर हा गोलंदाजी करत होता आणि त्याने ३ चेंडू खेळले आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. त्याने जेव्हा तिसरा चेंडू टाकला तेव्हा तो त्याच्या मानेला लागला आणि त्याला तेव्हा खेळणे शक्य झाले नाही त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आहे. गिल आता रिटायर हर्ट झाला आहे. तथापि, भारतीय चाहते गिल लवकरच बरा होऊन फलंदाजीला परतेल अशी आशा बाळगतील. गिलच्या फलंदाजीत परतल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही अधिक दबाव येईल.
दुसऱ्या दिवसाच्या जेवणाच्या ब्रेकची घोषणा करण्यात आली आहे. भारताची धावसंख्या ४ बाद १३८ आहे. रवींद्र जडेजा ध्रुव जुरेलसोबत क्रीजवर आहे. या सत्रात भारताला वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या रूपात तीन धक्के सहन करावे लागले. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे निवृत्त झाला.






