(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘पुष्पा’ या चित्रपटामधून साऊथ स्टार अल्लू अर्जुनने आपला स्वॅग दाखून चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. अभिनेत्याने २०२१ मध्ये प्रचंड खळबळ माजवली. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर, पुष्पराज ‘पुष्पा २ द रुल’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे, तेही धमाकेदार. हा चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना अधिक काळापासून आहे. आणि आता निर्माते हा चित्रपट चाहत्यांसाठी लवकरच प्रदर्शित करणार आहे. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच ‘पुष्पा 2’ चे निर्माते श्रीमंत झाल्याची बरीच चर्चा होत आहे. या आगामी चित्रपटाने रिलीजपूर्वी एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता या बातमीवर निर्मात्यांनी मौन सोडले आहे.
‘पुष्पा 2’ ने 1000 कोटी रुपयांची केली कमाई?
Mythri Movie Makers चे निर्माते रविशंकर यांनी चित्रपटाच्या थियेट्रिकल आणि नॉन थियेट्रिकल व्यवसायाची माहिती दिली आहे. निर्माते नवीन येरनेनी आणि रवी यांनी गुरुवारी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की पुष्पा 2: द रुल 5 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 1000 कोटींहून अधिक कमाई केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या चित्रपटाच्या कमाईबाबत रवी म्हणाले की, पुष्पा 2 ने त्याच्या नॉन थिएटर व्यवसायात चांगली कामगिरी केली आणि 425 कोटी रुपये कमावले आहे. जेव्हा आम्ही थिएटर व्यवसाय जोडतो, तेव्हा प्री-रिलीझ व्यवसायात एकूण रु. 1000 कोटींहून अधिक कमाई शक्य दिसते आहे, परंतु हा एक अंदाज आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss 18 : मुस्कान बामणेनंतर या सदस्याचा बिग बॉसच्या घरातून पत्ता कट
ओटीटी राइट्स 275 कोटींना विकले
सॅकनिल्कच्या मते, ‘पुष्पा 2’ चे थिएटर हक्क जगभरात 600 कोटी रुपयांचे आहेत. नॉन-थिएटर बद्दल बोलायचे तर, त्याच्या OTT राइट्सनी 275 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि उपग्रह हक्क 85 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटाचे संगीत हक्क 65 कोटी रुपयांना विकले गेल्याचे सांगण्यात येत आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट ५ डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे देखील वाचा – Bigg Boss 18 : घरातील या दोन स्पर्धकांवर सलमान संतापला! म्हणाला…तू समोर येऊन
‘पुष्पा’ने केली होती इतकी कमाई
2021 मध्ये रिलीज झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट चित्रपटगृहात ब्लॉकबस्टर ठरला होता. बॉलीवूड हंगामा नुसार, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाने 108.26 कोटींचा व्यवसाय केला होता. चित्रपटाचे संवाद आणि ऊ अंतवा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आणि चाहत्यांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम देखील केले होते. आता तसाच प्रतिसाद प्रेक्षक ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाला देणार का? हे पाहणे उत्कंठाचे होणार आहे.