(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राज कुंद्रा यांच्यावर फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या जोडप्यावर मुंबईतील एका व्यावसायिकासोबत फसवणूक केल्याचा आरोप आहे. या वादाच्या दरम्यान राज कुंद्राने ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा वाद सध्या जास्त चर्चेत आहे.
राज कुंद्रा यांनी इंडिया टुडेशी बोलताना दावा केला की त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही आणि सत्य लवकरच बाहेर येईल. ते म्हणाले, ‘फक्त वाट पहा आणि पहा, कारण हे जीवन आहे. आम्ही काहीही बोललो नाही कारण आम्हाला माहित आहे की आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. सत्य शेवटी बाहेर येईलच. आम्ही आयुष्यात कधीही काहीही चुकीचे केले नाही आणि कधीही करणार नाही.’ असे त्यांनी म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये, आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध ६०.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एका अज्ञात व्यक्तीलाही आरोपी बनवण्यात आले .
व्यावसायिकाने जोडप्यावर केले आरोप
तक्रारदार दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की या जोडप्याने त्यांना ६० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे, ज्यामध्ये शेट्टी आणि कुंद्रा यांची आता बंद पडलेली कंपनी ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’चा समावेश आहे. व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान ही रक्कम गुंतवली होती, परंतु ती रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी ये दोघांवर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.
‘तो थेट बेडरूममध्ये शिरला अन्…’, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती ?
कंपनी आर्थिक संकटात सापडली
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आरोप निराधार असल्याचे म्हटले. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले होते आणि ते पूर्णपणे नागरी स्वरूपाचे असल्याचे म्हटले होते. वकिलाने सांगितले की, ‘हा एक जुना व्यवहार आहे, ज्यामध्ये कंपनी आर्थिक संकटात गेली आणि शेवटी एका दीर्घ कायदेशीर लढाईत अडकली. यामध्ये कोणताही गुन्हा नाही. आमच्या सीएने वेळोवेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर केली आहेत.’ असे त्यांच्या वकिलाने म्हटले.
शिल्पाच्या वकिलांचा युक्तिवाद
तक्रारदार दीपक कोठारी यांचे वकील जैन श्रॉफ यांनी सांगितले की त्यांच्या क्लायंटने पुराव्यांसह पैसे गुंतवले होते. कंपनीने त्यांची दिशाभूल केली. उलट, शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात की तक्रारदार स्वतः कंपनीत भागीदार होता. त्यांच्या मुलाला संचालक बनवण्यात आले. जर कंपनीला नफा झाला तर तो दोघांमध्ये विभागला जाईल.