(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसलेल्या चोरानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना गेल्या वर्षी 16 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री घडली होती.मुंबईतल्या राहत्या घरी अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. यात अभिनेता सैफ अली खान याच्या पाठीला जोरदार दुखापत झाली होती. या हल्ल्याची चर्चा सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती.
परंतु काही वर्षांपूर्वी त्याची बहीण सोहाच्या घरी असाच अनुभव आला होता. सोहा अली खानच्या घरी देखील अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी तिचा जोडीदार आणि त्या व्यक्तीमध्ये काहीशी झटापटही झाली होती. जो त्यांच्या घराच्या बाल्कनीतून पडला.
सोहाने मुंबई आणि दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना तो भयानक अनुभव तिला आठवला.
सोहाने सांगितले की, “कुणालने त्याला बघताच लाथ मारली आणि बाल्कनीत झटापट करत गेले. मी यावेळी खोलीतच होते, मी पोलिसांनी फोन करण्याचा प्रयत्न करत होते, शेवटी पोलिसांनी फोन उचलला.
तेवढ्यात कुणाल आत आला आणि म्हणाला, ‘तो कदाचित मेला असेल’.”
या घटनेबद्दल सविस्तर बोलताना तिने सांगितले “मुंबईत आमचे घर फोडले गेले. चोर आमच्या बेडरूममध्ये होता. आम्ही झोपलो होतो,
पहाटेचे ४ वाजले होते. आम्हाला कसला तरी आवाज आला, कुणालला कसला तरी संशय आला म्हणून तो तपासायला गेला, त्यानं बाल्कनीचा पडदा बाजूला केला, तर समोरच आणि तिथे एक माणूस होता ज्याच्या चेहऱ्यावर रुमाल होता.”
‘तो तर आठवड्याच्या शेवटी येऊन फुटेज खातो…’, ‘राईज अँड फॉल’च्या होस्टने सलमान खानची उडवली खिल्ली
सोहाने मुलींच्या गैरवर्तनाबद्दलही केली चिंता व्यक्त
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सोहाने मुलींच्या गैरवर्तनाबद्दलही चिंता व्यक्त केली. त्याबद्दल ती म्हणाली, ” जेव्हा मी दिल्लीत राहत होते, तेव्हा रस्त्यावर दिवे नसल्यामुळे रात्री पूर्णपणे अंधार असायचा. त्यावेळी ती नेहमी ग्रुपसह प्रवास करत असे आणि पालकांनी दिलेल्या वेळेच्या आत ती घरी येत असे. तिने असेही म्हटले की तिला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची गरज भासली नाही.पण माझ्या ओळखीच्या अनेक महिलांना गैरवर्तनाचा सामना करावा लागला. सार्वजनिक ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत, हे दुर्दैव आहे.”