'त्या' भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! 'From' सीझन ४ 'या' दिवशी OTT वर येणार (Photo Credit- X)
तिसऱ्या सीझनचा शेवट अत्यंत धक्कादायक वळणावर झाला होता. शेवटच्या भागात ‘जिम’ हा त्या भयानक मॉन्स्टर्सचा शिकार झाल्याचे दाखवण्यात आले होते आणि ‘जुली’समोर तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे भासले. मात्र, जिमचा खरोखर मृत्यू झाला आहे की तो जिवंत आहे, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले असून, या प्रश्नांची उत्तरे आता चौथ्या सीझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
First teaser for ‘FROM’ Season 4. Premiering April 19 on MGM+ pic.twitter.com/zfEe2ZmcgB — DiscussingFilm (@DiscussingFilm) February 4, 2026
मेकर्सनी एका नवीन व्हिडिओ टीझरद्वारे अधिकृत घोषणा केली आहे की, ‘From’ चा चौथा सीझन १९ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार आहे. हा सीझन या सीरिजचा शेवटचा भाग असेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर चाहते या शहराच्या रहस्याबाबत विविध तर्क-वितर्क (Theories) लढवत आहेत.
हॅरोल्ड पेरिन्यू, कॅटालिना मोरीनो, डेव्हिड एल्पे आणि स्कॉट मॅकॉर्ड यांसारख्या तगड्या कलाकारांनी सजलेली ही सीरिज MGM+ आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजचे आधीचे तिन्ही सीझन प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत, ज्यामुळे भारतातही या शोची प्रचंड क्रेझ आहे.
ही सीरिज एका अशा गूढ शहरावर आधारित आहे, जिथे जो कोणी एकदा पोहोचतो, त्याला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. दिवसा हे शहर सामान्य वाटते, मात्र रात्र होताच तिथल्या जंगलातून मानवी रूप धारण केलेले भयानक मॉन्स्टर्स बाहेर येतात. या शहराचे रहस्य काय आहे आणि लोक तिथून कधी बाहेर पडू शकतील का? हेच या सीरिजचे मुख्य आकर्षण आहे.
हॉलिवूडमधील हसवणारी स्टार काळाच्या पडद्याआड; ‘Home Alone’ फेम अभिनेत्रीचे ७१ व्या वर्षी निधन






