Ranbir Kapoor (फोटो सौजन्य- X अकाउंट)
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरने अलीकडेच त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. रणबीरने सांगितले की, त्याचे वडील ऋषी कपूर जेव्हा त्यांचे चाहते त्यांच्याकडे ऑटोग्राफ किंवा फोटो घेण्यासाठी यायचे तेव्हा ते अनेकदा त्यांच्याशी उद्धटपणे वागायचे. मात्र, वडिलांच्या या सवयीतून मी शिकलो आणि स्वतःला असे करण्यापासून वाचवले असेही अभिनेत्याने सांगितले आहे.
यश आणि अपयश जवळून पाहिले आहे
रणबीर कपूरने खुलासा केला की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे यश आणि अपयश दोन्ही पाहिले आहे. यासोबतच आपल्या अपयशामागे कोणती कारणे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. निखिल कामथशी बोलताना अभिनेता रणबीर म्हणाला, “मी माझ्या कुटुंबातील आणि घरातील सदस्यांचे यश आणि अपयश पाहत मोठा झालो आहे. त्यामुळे हे मला खूप लवकर समजले कारण मी एका चित्रपट कुटुंबात वाढलो आहे.” असे त्याने सांगितले.
अपयशातून शिकला रणबीर
तो पुढे याबद्दल बोलताना म्हणाला की, “मी खूप यशस्वी माणसे पाहिली आहेत आणि मी अपयशाशी झुंजतानाही पाहिले आहे. ते अपयशी का आहेत हे मला माहीत आहे. मी त्यांना समजून घेतले आहे आणि मी त्यांना अगदी लहानपणापासून पाहत आलो आहे.” आणि या सगळ्यातुनच तो खूप काही शिकला आहे असे त्याने सांगितले.
ऋषी कपूर चाहत्यांना फटकारायचे
रणबीर कपूरने त्याचे वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितले की, त्यांना चाहत्यांचा राग यायचा. मात्र, त्याला असे करण्यात कोणताही रस नाही. अभिनेता म्हणाला, “जेव्हा चाहते माझ्या वडिलांकडे यायचे, तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचो आणि माझे वडील चाहत्यांकडे खूप तिरस्काराने आणि निराशेने बघायचे. तेव्हा मी ठरवले होते की मी माझ्या चाहत्यांसोबत असे काहीही करणार नाही. आज जेव्हा कोणी माझ्याकडे फोटो किंवा ऑटोग्राफ घेतो तेव्हा मी आनंदाने यांच्याकडे पाहतो असे त्याने सांगितले.






