Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सिनेसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण! ऑस्ट्रेलियातील La Trobe विद्यापीठाकडून राणी मुखर्जीला मानद ‘Doctor of Letters’ पदवी जाहीर

राणी मुखर्जीला भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन दशकांच्या योगदानासह समाजसेवेतील कार्याची दखल घेत ऑस्ट्रेलियातील La Trobe University कडून मानद 'Doctor of Letters (D.Litt.)' पदवी जाहीर. IFFM 2026 दरम्यान होणार गौरव.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 11:57 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rani Mukharjee: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukharjee ) हिला तिच्या उल्लेखनीय अभिनय कारकिर्दीसह समाजसेवेतील योगदानाची दखल घेत आणखी एक प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियातील La Trobe University तर्फे तिला ‘Doctor of Letters (D.Litt.)’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

हा सन्मान 2026 Indian Film Festival of Melbourne (IFFM) दरम्यान १४ ऑगस्ट २०२६ रोजी मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील जवळपास तीन दशकांच्या उल्लेखनीय योगदानासोबतच महिला, बालक आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राणी मुखर्जीला हा मानाचा सन्मान देण्यात येत आहे.

१३ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या IFFM 2026 मध्ये प्रदान करण्यात येणारा हा सन्मान राणी मुखर्जीच्या दीर्घ आणि यशस्वी चित्रपट कारकिर्दीबरोबरच तिच्या सामाजिक बांधिलकीचाही गौरव करणारा आहे. ‘ब्लॅक’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘हिचकी’, ‘मर्दानी’ फ्रँचायझी आणि ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी केवळ प्रभावी अभिनयच केला नाही, तर महिलांचे हक्क, लैंगिक समानता, दिव्यांग समावेशन आणि सामाजिक परिवर्तन यांसारखे महत्त्वाचे विषय मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून प्रभावीपणे मांडले.

चित्रपटांव्यतिरिक्त, राणी मुखर्जी या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि समुदाय विकासाशी संबंधित विविध मानवतावादी उपक्रमांमध्येही सक्रिय सहभागी राहिल्या आहेत. त्यामुळे अभिनयासोबतच त्यांच्या सामाजिक कार्याचाही जागतिक स्तरावर गौरव होत आहे.

Aamir Khan: ‘Love Jihad’च्या आरोपांना आमिरचं सडेतोड प्रत्युत्तर; कुटुंबाचं उदाहरण देत म्हणाला, ‘माझ्या बहिणींनी हिंदू मुलांशी..”

या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना राणी मुखर्जी म्हणाली, “सिनेमा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक राहिला आहे. कथा लोकांच्या मनात भावना जागृत करण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद ठेवतात. हा सन्मान मी भारतातील आणि जगभरातील माझ्या चाहत्यांना समर्पित करते.”

La Trobe University चे कुलपती जॉन ब्रम्बी यांनी राणी मुखर्जीच्या कार्याचं कौतुक करत सांगितलं की, तिचे योगदान केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून सामाजिक न्याय, समानता आणि सर्वसमावेशकता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर समाजात संवाद निर्माण करणारे आहे.

तर Indian Film Festival of Melbourne च्या संचालिका मितू भौमिक लँग यांनी हा सन्मान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आणि IFFM साठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं.

“तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन, म्हणाला, ‘System खऱ्या अर्थाने मुळापासून’

Web Title: Rani mukerji to receive an honorary doctor of letters from australia la trobe university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • awarded
  • Entertainemnt News
  • Rani Mukharjee

संबंधित बातम्या

Yuvraj Disale awarded: क्रीडा क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती! युवराज दिसले यांना ‘शरद क्रीडा गौरव पुरस्कार’ प्रदान
1

Yuvraj Disale awarded: क्रीडा क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती! युवराज दिसले यांना ‘शरद क्रीडा गौरव पुरस्कार’ प्रदान

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
2

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.