(फोटो सौजन्य-iStock)
काही वर्षांच्या ब्रेकनंतर राणी मुखर्जीने आता चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. मुलीच्या जन्मानंतर राणीने काही काळ चित्रपटांतून ब्रेक घेतला. राणी अनेकदा मुलांच्या संगोपनासाठी टिप्स देते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, पुरुषांनी मुलांसमोर त्यांच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे. वडिलांनी मुलांसमोर आईचा अनादर केला तर मुलाला असे करणे योग्य आहे आणि त्यात काही गैर नाही असे वाटते, मग तो मोठा झाल्यावरही तेच करतो. यासोबतच राणीने मातांच्या वर्तनावरही असे काही सांगितले जे मुलांसाठी चांगले नाही. जाणून घेऊयात सविस्तर.
घरातील स्त्रिया अनादर का करतात सहन ?
राणी म्हणाली की, अनेकदा घरातील स्त्रिया अनादर सहन करतात आणि कुटुंबात शांतता आणि आनंद टिकवण्यासाठी काहीही बोलत नाहीत. मात्र, या सगळ्याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. राणी म्हणाल्या की, ‘महिलांनी स्वत:ला कोणत्याही प्रकारे कनिष्ठ समजू नये. ही सूचना गृहिणीसाठी सर्वात महत्त्वाची आहे. ‘ असे अभिनेत्रीने स्पष्टपाने सांगितले आहे. जाणून घ्या मुलांसमोर तुमच्या जोडीदाराचा अनादर केल्याने काय तोटे होऊ शकतात.
मुलांवर नकारात्मक परिणाम होतो
घरगुती हिंसाचारामुळे मुलांना गंभीर शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जे मुले त्यांच्या पालकांमधील हिंसाचार पाहतात ते नंतर त्यांच्या नातेसंबंधात हिंसक होऊ शकतात. म्हणून पालकांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
मुलांना सुरक्षित वाटत नाही
मुलांना सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची गरज असते. जोडीदाराचा आदर न केल्याने मुलांना घरात असुरक्षित वाटू शकते. मुलाला असे वाटू शकते की त्याच्या कुटुंबात प्रेम नाही आणि तो आपल्या घरात सुरक्षित नाही. यामुळे मुलाला स्वतःच्या कुटुंबात असुरक्षित वाटते आणि तो कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे असे करणे पालकांनी टाळले पाहिजे.
शिक्षणावर होऊ शकतो परिणाम
पालकांनी आपल्या जोडीदाराचा आदर न केल्याने मुलाच्या भविष्यातील नातेसंबंधांवरच परिणाम होत नाही तर मुलाच्या शिक्षणावर आणि सामाजिक संबंधांवरही परिणाम होतो. मुलांना शाळेत लक्ष केंद्रित करण्यात आणि मित्रांशी मैत्री राखण्यात त्रास होऊ शकतो.
हे देखील वाचा- मुलीला भेटल्यानंतर पुन्हा मोहम्मद शामीवर पत्नीचे आरोप, सोशल मीडियावर झालं उघड
सामाजिक विकास
सामाजिक विकास याचा मुलाच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर आणि सामाजिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे मुलाच्या सर्वांगीण विकासावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. राणी मुखर्जीला सांगायचे आहे की, पालकांनी मुलांसमोर त्यांच्या जोडीदाराशी अयोग्य बोलू नये किंवा वाईट वागू नये. यासगळ्याचा परिणाम नंतर मुलांवर होऊ शकतो त्यामुळे सगळ्या पालकांनी या गोष्टीची काळजी घ्यावी.