(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पद्मविभूषण रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोमवारी अचानक बीपी कमी झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आता या बातमीमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. प्रत्येक चाहत्याला ही बातमी ऐकून धक्का बसला आहे.
अजय देवगणने कार्यक्रम रद्द केला
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांना आपापल्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. तर बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता X वर एक संवादात्मक सत्र करणार होता. ‘सिंघम अगेन’साठी हा प्रमोशन इव्हेंट होता. मात्र रतन टाटा यांची बातमी मिळताच अभिनेत्याने आपले काम पुढे ढकलले आहे. अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. अभिनेत्याने लिहिले की, ‘रतन टाटा सरांच्या सन्मानार्थ, पुढील माहिती मिळेपर्यंत आम्ही आजचे Q आणि A #AskAjay रद्द करत आहोत.” असे लिहून अभिनेत्याने आपले काम पुढे ढकलले आहे.
In honor and respect of the late Ratan Tata Sir, we are postponing tomorrow’s #AskAjay until further notice. https://t.co/UKLDxfiwf1
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 9, 2024
हे देखील वाचा- रतन टाटा यांना दिलजीत दोसांझने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये वाहिली श्रद्धांजली, प्रेक्षक झाले भावुक!
आज त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याआधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे ठेवण्यात येणार आहे. अजय देवगण व्यतिरिक्त, इतर अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी सलमान खान, अर्जुन कपूर, करण जोहर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, वरुण धवन, आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, रोहित शेट्टी, श्रद्धा कपूर, आर. माधवन आणि बॉलीवूड कलाकारांनी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.