भारतीय अभिनेत्रो शर्वरी वाघ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मुंज्या, महाराज आणि वेदा या तिन्ही चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. चाहते तिच्यावर अभिनयावर आणि तिच्या चित्रपटावर भरभरून प्रेम करत आहेत. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर आज दसऱ्यानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि स्वतःचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याचदरम्यान अभिनेत्रीचा आगामी चित्रपट 'अल्फा' चित्रपट लवकरच चित्रपगृहात दाखल होणार आहे. ज्यामध्ये ती आलिया भट्टसह स्क्रीन शेअर करणार आहे.
शर्वरीने दसऱ्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

अभिनेत्री शर्वरी वाघने दसऱ्यानिमित्त सोनेरी रंगाची लेहंगा चोळी परिधान केली आहे. ज्याध्ये तिचे सौंदर्य आणखी चमकत आहे. या आकर्षित लेहंग्यासह अभिनेत्रीने तिचे फोटो शेअर केले आहेत.

शर्वरीने या सोनेरी लेहंग्यावर एक साधी गोल्डन पट्टी असलेली ओढणी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा हा लेहंग्यावरील लुक आणखी खुलला आहे.

शर्वरीने या सुंदर लेहंग्यावर सध्या मेकअपची निवड केली आहे. तिने डोळ्यात काजल, ओठांवर गुलाबी न्यूड लिपलीस्ट, गुलाबी ब्लश, मस्कारा आणि आयलायनर लावले आहे.

तसेच, सुंदर मेकअपसह अभिनेत्रीने या लेहंग्यावर टेम्पल ज्वेलरी परिधान केल्या आहेत. ज्यामुळे शर्वरीचा लुक मोहक आणि आकर्षित दिसत आहे.

अभिनेत्रीने केसांचे फ्लिक्स काढले असून, थोडे मेस्सी हेअर शर्वरीला शोभून दिसत आहेत. याचबरोबर तिने पाहत गोल्डन टेम्पल बांगड्या घातल्या आहेत. यासगळ्या परिपूर्ण वस्तूंसह शर्वरीचा लुक अप्रतिम दिसत आहे.






