(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अभिनेता मनोज बाजपेयी यांनी 1973 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमधील छोट्या भूमिकांद्वारे सुरुवात केली. 55 वर्षीय अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये काही फ्लॉप आणि काही सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटामधून त्याचे अभिनय कौश्यल पाहून चाहत्यांच्या तो आवडता अभिनेता बनला आहे. त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आणि मुंबईत अनेक मालमत्ताही खरेदी केल्या. अशा परिस्थितीत गुरुवारी एक बातमी समोर आली. मनोज बाजपेयी यांनी त्यांचे एक आलिशान अपार्टमेंट विकले अशी चर्चा सुरु झाली.
अभिनेत्याने 11 वर्षे जुने घर विकले
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याने आता त्याची पत्नी शबाना बाजपेयी यांच्यासोबत २०१३ मध्ये खरेदी केलेले घर विकले आहे. या जोडप्याने हे घर 6.4 कोटींना खरेदी केले होते आणि आता 11 वर्षांनंतर ते 9 कोटींना विकले आहे. त्या काळात अभिनेत्याने ५४ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरून हे घर खरेदी केले होते.
हे अपार्टमेंट 1,247 स्क्वेअर फूटमध्ये बांधले होते
मनोज आणि शबाना यांनी विकलेले अपार्टमेंट महालक्ष्मी टॉवरमध्ये आहे, ज्याचे क्षेत्रफळ 1,247 स्क्वेअर फूट आहे. यात एकूण 240 चौरस फूट आहे आणि त्यात दोन कार पार्किंगचाही समावेश आहे. तसेच, मनोज आणि शबाना यांचे २००६ साली लग्न झाले होते. दोघेही एका मुलीचे पालक आहेत. अभिनेता अनेकदा सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करताना दिसत असतो.
हे देखील वाचा- मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सान्या मल्होत्राच्या “मिसेस” चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन!
बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्यांची पत्नी शबाना बाजपेयी या दोघांनी ही त्यांची विकत घेतलेला हे आलिशान अपार्टमेंट का विकले हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे. तसेच, हे अपार्टमेंट विकून हे कुटूंब कुठे स्थानिक होणार आहे हे देखील समजले नाही आहे.
अभिनेत्याचा आगामी चित्रपट
अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. याआधी तो ‘भैय्या जी’मध्ये दिसला होता. जे पडद्यावर जास्त कमाई करू शकला नाही. या वर्षात आतापर्यंत त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यात ‘सायलेन्स 2’ आणि ‘द फेबल’ यांचा समावेश आहे. तसेच अभिनेता लवकरच नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.