Tamannaah Bhatia (फोटो सौजन्य-Instagram)
‘स्त्री 2’ मधून ‘आज की रात’ कडे देशाचे लक्ष वेधणारी पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया तिच्या आगामी ‘ओडेला 2’ या चित्रपटाच्या “तीव्र क्लायमॅक्स” सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. हा सीन हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट केला जाईल जिथे निर्मात्यांनी एक मोठा मंदिर सेट बांधला आहे. अभिनेत्री 800 ज्युनियर कलाकारांसोबत या सीनचे शूटिंग करताना दिसणार आहे.
हैदराबाद बोनालूच्या निमित्ताने या चित्रपटाचं नवीन पोस्टर अनावरण करण्यात आले आहे. आणि निर्मात्यांनी सोशल मीडियावर हे पोस्टर शेअरदेखील केले आहे. पोस्टरमध्ये तमन्नाने साडी नेसलेली दिसत असून तिने डोक्यावर बोनम घेतले आहे. या वर्षी रिलीज होणाऱ्या ‘ओडेला 2’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अभिनेत्रीने सखोल प्रशिक्षण आणि तालीम घेतली आहे. तमिळ ब्लॉकबस्टर ‘अरनमानाई 4’ सह 2024 ला सुरुवात करणाऱ्या तमन्नासाठी हा चित्रपट दुसरा ब्लॉकब्लस्टर चित्रपट ठरणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या अभिनयासाठी आणि चित्रपटासाठी नेहमीच चर्चेत असलेली व्यक्ती आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यामुळेच ती दिग्दर्शकाची आणि चित्रपट निर्मात्यांसाठी नेहमीच खास ठरली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. तमन्ना भाटिया ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एकआघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर आयुष्यात अनेक चित्रपटात काम केले आहेत. ते सगळे चित्रपट चित्रपटगृहात सुपरहिट ठरलेले आहेत. तमन्नाने तामिळ, तेलगू आणि हिंदी या तिनी सिनेमासृष्टीत काम करून ती पुढे आली आहे. तिने नुकताच या वर्षी ‘अरनमानाई 4’ काम करताना प्रेक्षकांना दिसली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात ब्लॉकब्लस्टर ठरला होता आणि भरपूर कमाई देखील केली.
हे देखील वाचा- रणबीर कपूरने वडील ऋषी कपूरसारखे न होण्याचा घेतला निर्णय, म्हणाला- ‘बाबा चाहत्यांना फटकारायचे’!
सध्या तमन्नाच्या ‘आज की रात’ या गाण्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे हेच गाणं आता सर्वत्र वाजताना दिसत आहे. तसेच ‘ओडेला 2’ व्यतिरिक्त तिचा “वेदा” नावाचा एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. OTT आघाडीवर, तिच्याकडे ‘डेअरिंग पार्टनर्स’ आणि नीरज पांडेचा एक शीर्षकहीन चित्रपट देखील लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.






