कॅमरून ग्रीनसह 'हे' ५ खेळाडू खाऊन जाणार भाव! (Photo Credit - X)
१. कॅमेरून ग्रीन (Cameron Green)
या यादीतील पहिले नाव ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याचे आहे. २६ वर्षीय ग्रीन आता पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहे आणि आगामी हंगामात धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. यावर्षी तो लिलावात सर्वात महागडा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. त्याने एकूण २९ सामने खेळले आहेत. २८ डावांमध्ये ४१.५९ च्या सरासरीने ७०७ धावा केल्या आहेत. २९ डावांमध्ये ४१.५ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतीमुळे ग्रीनने आयपीएल २०२५ च्या लिलावात सहभाग घेतला नव्हता.
२. जेमी स्मिथ (Jamie Smith)
कॅमेरून ग्रीनप्रमाणेच अनेक संघांचे लक्ष इंग्लिश यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथ याच्यावर केंद्रित झाले आहे. स्मिथ फलंदाजीसह यष्टिरक्षणामध्येही कुशल आहे. २५ वर्षीय स्मिथने इंग्लंडकडून एकूण ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ५ डावांमध्ये २६ च्या सरासरीने १३० धावा केल्या आहेत.
३. लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone)
लियाम लिविंगस्टोन याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत फार मोठी छाप सोडलेली नसली तरी, लीगमध्ये त्याची मागणी अजूनही कायम आहे. आगामी हंगामातही त्याच्यावर जोरदार बोली लागण्याची शक्यता आहे. त्याने ४९ सामने खेळले आहेत. ४७ डावांमध्ये २६.२८ च्या सरासरीने १०५१ धावा केल्या आहेत. २७ डावांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.
४. मथीशा पथिराना (Matheesha Pathirana)
श्रीलंकेचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याच्या भेदक गोलंदाजीची सर्वांना कल्पना आहे. मात्र, त्याला दुखापतीची समस्या नेहमीच भेडसावते. जर तो तंदुरुस्त राहिला, तर त्याला उत्तर नाही. याच कारणामुळे सर्व संघांचे लक्ष त्याच्यावर आहे.
५. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)
लखनौ सुपर जायंट्सने रवी बिश्नोई याला रिलीज करण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक होता. आता तो लिलावाच्या पूलमध्ये आल्यामुळे, त्याच्यावर पुन्हा एकदा जोरदार बोली लागण्याची अपेक्षा आहे. युवा स्टारने आयपीएलमध्ये ७७ सामने खेळले आहेत. ७६ डावांमध्ये त्याला ७२ विकेट्स घेण्यात यश आले आहे.
हे देखील वाचा: R Ashwin नवी भविष्यवाणी…आयपीएल लिलावात या अनकॅप्ड ‘खेळाडूंना’ मिळणार चमकण्याची संधी






