फोटो सौजन्य: Gemini
कंपनीने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की ही नवी MPV 18 डिसेंबर 2025 रोजी सादर केली जाणार. ही कार विशेषतः फॅमिली कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन विकसित केली जात आहे. चला, या MPV चे संभाव्य फीचर्स जाणून घेऊयात.
‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब
ही नवी Nissan MPV प्रत्यक्षात Renault सोबत मिळून विकसित करण्यात आली आहे. असा अंदाज आहे की या MPV चा बेस Renault Triber वर आधारित असेल, मात्र डिझाइनच्या बाबतीत यात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. Nissan या कारमध्ये आपली नवी डिझाइन लँग्वेज सादर करणार असून, त्यामुळे ही MPV इतर कार्सपेक्षा वेगळी दिसेल. कमी किमतीत जास्त स्पेस आणि आकर्षक लुक देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
लाँचपूर्वी ही MPV अनेकदा टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. समोर आलेल्या स्पाय Photos मध्ये साइड प्रोफाइल काही प्रमाणात Triber सारखा दिसतो, मात्र फ्रंट डिझाइन पूर्णपणे नवीन आहे. यात नव्या हेडलाइट्स, मोठी आणि वेगळ्या डिझाइनची ग्रिल, रूफ रेल्स आणि नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. मागील बाजूस नवीन बंपर आणि टेललॅम्प्स देण्यात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या MPV चा लूक अधिक फ्रेश आणि मॉडर्न भासेल.
नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल
Nissan ने अद्याप इंटिरिअरबाबत संपूर्ण माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, केबिनमध्ये नवीन मटेरियल्स आणि सुधारित डिझाइन देण्यात येण्याची अपेक्षा आहे. या MPV मध्ये तीन रो सीटिंग लेआउट मिळू शकतो, ज्यामुळे ती 5, 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये वापरता येईल. फीचर्समध्ये मोठा टचस्क्रीन सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग आणि दुसऱ्या रोसाठी स्लाइड होणाऱ्या सीट्स देण्यात येण्याची शक्यता आहे.
नव्या Nissan MPV मध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येण्याची शक्यता असून, ते दैनंदिन वापरासाठी योग्य असेल. हे इंजिन मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह सादर केले जाऊ शकते. किमती बाबत कंपनी विशेष लक्ष देत असून, ही MPV फॅमिली खरेदीदारांसाठी एक मजबूत आणि किफायतशीर पर्याय ठरेल, असा Nissan चा प्रयत्न असणार आहे.






