फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिचा पती बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान कमालीचा चर्चेत आहे. खान कुटुंबीयांसाठी गेले काही दिवस म्हणावे तितके खास नव्हते. त्यांनी एका धक्कादायक घटनेचा सामना केला होता. ती घटना म्हणजे, सैफ अली खानवर एका व्यक्तीने केलेला त्याच्यावर प्राणघातक हल्ला… या घटनेमुळे फक्त खान कुटुंबीयच नाही तर, अवघी इंडस्ट्री हादरली होती. त्या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला होता. या प्रसंगात करीना सैफच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळाली. त्यासोबतच तिने या घटनेमुळे मुलांची अधिक काळजी घेताना दिसली. नुकतीच करीनाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली होती. ज्यामुळे चाहते चिंतेत पडले असून एकच गोंधळ उडाला आहे.
काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर करीनाने एक पोस्ट शेअर केली होती, जी तिने आता डिलीट केली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या पोस्टने चाहते चिंतेत पडले असून सर्वांचेच लक्ष वेधलेय. शेअर केलेल्या पोस्टमध्ये करीना म्हणते, “तुम्हाला लग्न, घटस्फोट, चिंता, बाळाचा जन्म, मुलांचे संगोपन आणि एखाद्या आपल्यातल्या व्यक्तीला गमावणं यांसारख्या गोष्टी जोपर्यंत आपल्यासोबत घडत नाहीत, तोपर्यंत त्यो गोष्टी आपल्याला समजत नाहीत… या घटना तुमच्यासोबत घडल्याशिवाय आयुष्यातल्या परिस्थितींबद्दल आणि सिद्धांत हे कधीच समजणार नाही. तुम्हाला वाटत असेल, तुम्ही दुसऱ्यापेक्षा अधिक हुशार आहात. पण, जोपर्यंत आयुष्यात तुमच्यावर ती वेळ येत नाही आणि तुम्हाला नम्र करत नाही तोपर्यंत हे वाटतं राहिलं.”
या पोस्टबरोबर करीनाने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होतं आहे. त्यामुळे करीनाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. ‘नेमकं काय झालंय?’ असंही चाहते प्रश्न विचारत आहेत. तसंच ‘सर्वकाही ठीक आहे ना?’, ‘काही समस्या आहे का?’, त्यासोबतच ‘करीना आणि सैफ यांच्या नात्यात सर्व ठिक आहे ना ?’ असं देखील चाहते प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची हंसल मेहता दिग्दर्शित ‘द बकिंघम मर्डर्स’मध्ये झळकली होती. आता लवकरच करीना मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करीनासोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता आयुष्यमान खुरानाही पाहायला मिळणार आहे.