सोनाक्षी सिन्हा बर्थ डे : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आज वाढदिवस आहे. तिला तिच्या वाढदिवसाच्या दिनी तिला अनेक तिच्या मित्रपरिवाराने त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु सध्या चर्चेत आहे ते म्हणजेच झहीर इक्बाल याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट. बॉलीवूड वर्तुळातून अनेकदा सेलिब्रिटींचे नाते आणि ब्रेकअपच्या बातम्या येत असतात. काही जोडपी लोकांसोबत शेअर करतात, तर काही लपवून ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल. दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकवेळा ते पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात.
[read_also content=”खतरो के खिलाडीच्या नव्या सीझनमधील पहिल्याच टास्कमध्ये हे खेळाडू फेल https://www.navarashtra.com/movies/this-player-failed-in-the-very-first-task-in-the-new-season-of-khatron-ke-khiladi-season-14-541778.html”]
झहीर इक्बालची सोशल मीडिया पोस्ट
आता सोनाक्षीच्या वाढदिवशी झहीरने अनेक फोटो शेअर केले आहेत आणि एक खास कॅप्शन शेअर करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दोघांनीही अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही, परंतु अनेक प्रसंगी दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या या मोठ्या दिवशी, तिचा असलेला प्रियकर झहीर इक्बालने देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. झहीरने त्याच्या सोशल मीडियावर सोनाक्षीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना झहीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, हॅपी बर्थडे सोन्झ.
शेअर केले फोटो
पहिल्या फोटोमध्ये दोघे एका पार्टीत मस्ती करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ते एक खास बॉन्ड शेअर करताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटो दोघेही एकमेकांसोबत मस्ती करतानाच सेल्फी घेतला आहे. या फोटोच्या खाली अनेक चाहत्यांची आणि कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. या पोस्ट खाली अभिनेत्री सोनाक्षीने सुद्धा ईमोजी टाकले आहेत.