CID मध्ये दयाचा नवा अवतार, थरारक प्रोमो रिलीज
या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील CID या क्राइम शोमध्ये आणखी एक थरारक एपिसोड बघण्यासाठी तयार व्हा. पुन्हा एकदा निडर ACP प्रद्युमन (शिवाजी साटम) आपले दोघे सहकारी सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत (आदित्य श्रीवास्तव) आणि सीनियर इन्स्पेक्टर दया (दयानंद शेट्टी) यांच्या मदतीने एका रहस्यमय केसचा माग काढत आहेत. केसमधील रहस्य शिगेला पोहोचले आहे.
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं अल्पावधीतच पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त
कथानकात एका विदेशी पत्रकारांचा धक्कादायक मृत्यू होतो. हा पत्रकार आत्यंतिक कुतुहलाने जंगलातील राहिवाशांचा एक पारंपरिक विधी बघण्यासाठी दाट जंगलात शिरलेला असतो. शोध घेण्याचा त्याचा प्रवास एक प्राणघातक रहस्य म्हणून समोर येतो. त्याचा मृत्यू अपघाताने झाला होता का? की कोणती तरी दुष्ट शक्ती त्यामागे होती? दयाने CID मध्ये आदिवासी रूप धारण केल्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेला एक नवेपण मिळाले आहे. त्याच्या या नवीन अवतारात देखील त्याची ताकद आणि जोश मात्र तसाच आहे. कथानक बघत रहा, कारण जे पुढे उलगडणार आहे, ते कदाचित धक्कादायक असेल.
सीनियर इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणारा अभिनेता दयानंद शेट्टी आपल्या नवीन अवताराबद्दल म्हणाला, “अज्ञात प्रांतात घुसण्यासाठी दया एका आदिवाशाचे रूप धारण करणार आहे. आणि गुप्तपणे या केसचा छडा लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आता खोलात शिरण्याची वेळ झाली आहे, त्यांच्यात मिसळून त्यांच्यात बेमालूम लपलेले गुपित शोधून काढण्याची ही वेळ आहे. माझ्या रुपातला हा बदल आमच्या शोधातील एक महत्त्वाचा क्षण आहे, त्यामुळे हा बदल केवळ प्रसाधने वापरुन केलेला वरवरचा बदल नाही. सत्याच्या जवळ जाण्यासाठी उचललेले ते पाऊल आहे. हे रूपांतर केल्यामुळे काही सुगावा लागेल का? की उलट गूढ आणखी गडद होईल? जाणून घेण्यासाठी ट्विस्ट्स आणि जबरदस्त ॲक्शनने भरलेला हा एपिसोड अवश्य बघा.”
हाच तो चाकू, ज्याने सैफवर झाला होता हल्ला; शस्त्रक्रियेनंतरचा फोटो आला समोर