colors marathi indrayani serial on vithu pandharpurkar will come to indu help
कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत इंदूचं अंतर्मन, तिचं गोंधळलेलं मन आणि तिचं प्रेमाचं द्वंद्व हे सगळं विठूरायाच्या साक्षीने एका निर्णायक क्षणाला पोहचणार आहे. विठुरायाच्या मंदिरात अनेक प्रश्न मनात घेऊन बसलेली इंदू, डोळे अश्रूंनी भरलेले आणि मन संभ्रमात. प्रेम आणि नात्यांच्या गुंत्यात सापडलेली इंदू विठूरायाशी अगदी आर्ततेने संवाद साधताना दिसणार आहे. गोपाळवर प्रेम, पण त्याचं वागणं निराशाजनक.
अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
दुसरीकडे अधू, ज्याला मी मित्र मानलं तो माझ्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. गोपाळने घेतलेल्या निर्णयानुसार इंदुला विठूची वाडी, तिचं स्वप्न, तिची माणसं सोडून जाण्याची इच्छा नाहीये. आणि अशाचवेळी संकटकाळात तिला मार्ग दाखविण्यासाठी, तिच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी धावून येणार आहे ‘विठू पंढरपूरकर’. आणि इथेच सुरु होतो खऱ्या अर्थाने तिचा आत्मशोध. आता विठू पंढरपूरकर यांच्या सांगण्यावरून मालिकेत कोणतं वळण येणार ? इंदू कोणता निर्णय घेणार हे हळूहळू कळेलच.
प्रसिद्ध संगीत बँडमधील सदस्यांचे अपहरण, काही तासानंतर सापडले मृतावस्थेत; काय आहे संपूर्ण प्रकरण?
विठूरायाचा साधा, शांत संवाद तिच्या मनातला गोंधळ स्पष्ट करतो, “प्रश्न मनात पडला असेल, तर उत्तरही मनातच सापडेल. विठू पंढरपूरकर इंदुला सांगताना दिसणार आहे की मी जास्त काही नाही बोलणार कारण निर्णय तुझा असावा.”आणि प्रेम, हे त्याच्यावर असावं जो तुझं ‘मी’ पण आणि तुझं मन समजतो, स्वीकारतो आणि जपतो…ज्याच्यासोबत तू अधिक ‘तू’ राहू शकतेस.”इंदूचं मन शेवटी स्पष्ट होतं — ती म्हणते, “ज्याच्यासोबत मी अधिक ‘मी’ होते…तोच माझा खरा जोडीदार.”
शहनाज गिलने ६ महिन्यामध्ये १२ किलो वजन कसं घटवलं ? वाचा तिचा Diet Plan
या भावनिक संवादातून विठू पंढरपूरकर केवळ अध्यात्मिक मार्गदर्शक नाही, तर भावनात्मक समजूत देखील काढताना दिसणार आहे. “जोडीदार कसा असावा?” यावर विठू पंढरपूरकर तिला खूपचं छान प्रकारे समजावताना देखील दिसणार आहे. जोडीदार “स्वप्न लादणारा, की तुझ्या स्वप्नात स्वतःला शोधणारा असावा? ‘मी’ म्हणणारा की ‘आपण’ म्हणणारा? तुझ्या अस्तित्वाला मान्यता देणारा, की तुला स्वतःसारखं बनवू पाहणारा?” हा क्षण म्हणजे सध्याच्या पिढीच्या नात्यांतील गुंतागुंतीवर भाष्य करणारा देखील आहे.
आता खेळ सुरू…! करण जोहरच्या नव्या कोऱ्या ‘The Traitors’ चा ट्रेलर लाँच, उघडली अनेक गुपिते
या भावनिक गुंत्याच्या काळात, तिचा सखा, मार्गदर्शक आणि जिवलग विठूराया पंढरपूरकर तिला आधार देतो. मंदिरात नेहेमीप्रमाणे इंद्रायणीच्या अश्रूंना उत्तरं मिळतात आणि तिला आयुष्याच्या निर्णयांची दिशा मिळते. याचे आपण देखील साक्षीदार होऊया नक्की पहा इंद्रायणी सोम ते शनि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.