मुंबई : ‘बिग बॉसचा 15’ च्या ग्रॅन्ड फिनालेला चार चॉंद लावायला आज दीपिका पदुकोणने घरात एन्ट्री केली आहे. दीपिकाचा आगामी चित्रपट गेहराईयाँ (Gehraiyaan) हा 11 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिपीका आज बिग बॉसच्या मंचावर अवतरली आहे. बिग बॉसच्या मंचावर सलमान खान आणि दीपिकाची अनोखी केमेस्ट्री पाहायला मिळाली.
‘गेहराईयाँ’ चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मित्र-मैत्रिणीतील नातेसंबंध आणि त्यातून होणारी फसवणूक यावर आधारित हा चित्रपट आहे. दीपिकाचा बोल्ड अंदाज असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
दरम्यान, बिग बॉसच्या 15 च्या घरात आता करन कुंद्रा, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सेहजपाल या पाच स्पर्धकांमध्ये अंतिम चुरस दिसून येतेय. बिग बॉसची ही ट्रॉफी कोण पटकावणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.