(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सलमान खानचा रिॲलिटी शो “बिग बॉस १९” सध्या चर्चेत आहे. वीकेंड का वार दरम्यान आवेज दरबारला घराबाहेर काढण्यात आले. आवेजच्या जाण्याने घरात एक उदास वातावरण निर्माण झाले. अभिषेक बजाज आणि नेहल चुडासमा खूप दुःखी दिसत होते. या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांची नावे देखील उघड झाली आहेत. या आठवड्यात आठ स्पर्धकांना घराबाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले आहे. येणाऱ्या वीकेंड का वारमध्ये या आठ स्पर्धकांपैकी एकाचा पत्ता कट होणार आहे. या आठवड्यात कोणत्या स्पर्धकांना नामांकन देण्यात आले आहे ते जाणून घेऊया.
‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई
कोणाला नामांकन मिळाले आहे?
बिग बॉस तक या फॅन पेजनुसार, नामांकित स्पर्धकांमध्ये अमाल मलिक, नेहल चुडासमा, कुनिका सदानंद, अशनूर कौर, नीलम गिरी, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि झीशान कादरी या नावांचा नॉमिनेशनमध्ये समावेश आहे. या वर्षीच्या नामांकनांमध्ये बलाढ्य आणि कमकुवत दोन्ही खेळाडूंचा समावेश आहे. येणाऱ्या वीकेंड का वारमध्ये या ८ सदस्यांपैकी एकाचा प्रवास संपताना दिसणार आहे. आता हा स्पर्धक नक्की कोण असेल याकडे चाहत्यांचा लक्ष लागले आहे.
🚨 Nominated Contestants for this week ☆ Amaal Mallik
☆ Nehal Chudasama
☆ Kunickka Sadanand
☆ Ashnoor Kaur
☆ Neelam Giri
☆ Pranit More
☆ Tanya Mittal
☆ Zeishan Quadri Comments – who will EVICT? — BBTak (@BiggBoss_Tak) September 28, 2025
गौहर खानने रिॲलिटी चेक दिला
कालच्या वीकेंड का वारमध्ये अनेक मनोरंजक घटना पाहायला मिळाल्या. सलमान खानने घरातील सदस्यांना फटकारले असताना, बिग बॉस ७ ची विजेती गौहर खान देखील सलमान खानसोबत घरातील सर्व स्पर्धकांना रिॲलिटी चेक दिला. सगळ्यांचाच तिने चांगला क्लास घेतला. गौहरने अमाल मलिक आणि बसीर अली यांना फटकारले आणि त्यांना सांगितले की ते घरामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. गौहर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे. चाहते तीच भरभरून कौतुक करत आहेत.
‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या कलाकारांनी केला कल्ला
गौहर आणि सलमान खानच्या फटकारानंतर, ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या कलाकारांनी घरातील सदस्यांचे मनोरंजन केले. वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, मनीष पॉल आणि रोहित सराफ यांनीही घरातील सदस्यांसोबत मजेदार खेळ खेळले. त्यांच्यासोबत स्टँड-अप कॉमेडियन हर्ष गुजराल आणि बिग बॉस ओटीटी २ फेम स्पर्धक अभिषेक मल्हन देखील दिसले. त्यांनी देखील घरातील स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना भरभरून हसवले.