Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाल सिंग चड्ढा’ सुसाट; दिल्लीतील वकिलाची आमिर खानविरोधात ‘ही’ तक्रार

भारतीय सैन्याचा (Indian Army) अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमिर, त्याचा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 13, 2022 | 12:57 PM
‘लाल सिंग चड्ढा’ सुसाट; दिल्लीतील वकिलाची आमिर खानविरोधात ‘ही’ तक्रार
Follow Us
Follow Us:

अभिनेता आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा प्रदर्शनापुर्वीपासून चर्चेत आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मिडियावर सुरु असताना आता चित्रपटावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे दिसत आहे. चित्रपटात भारतीय सैन्याचा (Indian Army) अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमिर, त्याचा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट 11 ऑगस्ट ला रिलीज झाला. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटावर वाद निर्माण झाला आहे. लाल सिंग चड्ढामधील भारतीय लष्कराच्या चित्रणामुळे सशस्त्र दलांचा अनादर झाल्याचा आरोप दिल्लीस्थित एका वकिलाने केला आहे. शुक्रवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आहे. पॅरामाउंट पिक्चर्ससह चित्रपटाचे निर्माते, आमिर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

[read_also content=”भारतात आता VLC Media Player वापरता येणार नाही! सरकारचा मोठा निर्णय https://www.navarashtra.com/india/vlc-media-player-can-no-longer-be-used-in-india-big-decision-of-govt-nrps-315531.html”]

दिल्लीतील वकील विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. “कारगिल युद्धात लढण्यासाठी एका मतिमंद व्यक्तीला लष्करात सामील होण्याची परवानगी देण्यात आली होती. कारगिल युद्ध लढण्यासाठी लष्करातील सर्वोत्तम जवानांना पाठवण्यात आलं होतं आणि कठोर प्रशिक्षित लष्करी जवानांनी युद्ध लढलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी मुद्दाम या परिस्थितीचं चित्रण केलं”, असं त्यांनी तक्रारीत लिहिलं आहे. त्यानुसार आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 153A (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे), 298 (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे) आणि 505 (सार्वजनिक दंगल घडवून आणणारी विधाने) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यांनी केली.

हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

संबंधित वकिलाने असाही आरोप केला आहे की चित्रपटातील एका दृश्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या दृश्यामध्ये एक पाकिस्तानी कर्मचारी लाल सिंग चड्ढाला विचारतो की “मी नमाज अदा करतो, प्रार्थना करतो, लाल सिंग तू हे का करत नाही?” त्यावर लाल सिंगच्या भूमिकेतील आमिर म्हणतो, “माझी आई म्हणाली हा सर्व पूजापाठ मलेरिया आहे. त्यामुळे दंगल होतात.” चित्रपटातील हा संवाद संपूर्ण हिंदू समुदायाला उद्देशून बदनामीकारक असल्याचं वकिलांनी म्हटलं आहे.

Web Title: Delhi lawyers complaint against aamir khan regarding laal singh chaddha movie nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2022 | 12:57 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • entertainment
  • indian army
  • laal singh chaddha

संबंधित बातम्या

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
1

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित
2

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ
3

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता
4

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.