Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

Gulmarg Rescue Operation : जगातील सर्वात उंच रापवेमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाल्याने गुलमर्गमध्ये ३०० पर्यटकांचा जीव टांगणीला लागला. यानंतर भारतीय लष्कराच्या मदतीने एक रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले ज्याच्या मदतीने सर्व पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश मिळाले. घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 09:01 AM
हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जगातील सर्वात उंच रोपवेमध्ये अचानक निर्माण झालेल्या संकटामुळे शेकडो पर्यटकांचा जीव धोक्यात आला होता.
  • प्रतिकूल हवामान आणि कठीण परिस्थितीत जवानांनी दाखवलेल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून लोक जवानांचे भरभरून कौतुक करत आहेत.
जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये असलेल्या जगातील सर्वात उंच रोपवेमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला ज्यानंतर हवेतच कॅबिनमध्ये अडकलेल्या ३०० पर्यटकांच्या जीव टांगणीला लागला. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. खराब वातावरण, डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. शेकडो लोक जमिनीपासून वर उंचावर अडकले होते ज्याच्या खाली फक्त खोल दरी दिसत होती. सर्वांचा श्वास रोखून होता कारण पुढे काय घडेल आपला जीव वाचेल की नाही याचीही शाश्वती देता येत नव्हती. परंतु याचवेळी भारतीय जवानांनी आपले सामर्थ्य दाखवत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ज्यामुळे या गंभार घटनेतून सर्व पर्यटकांचा जीव सुखरुप बाहेर काढण्यास मदत मिळाली.

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

६५ कॅबिन्समध्ये अडकले होते पर्यटक

माहितीनुसार, एकूण ६५ कॅबिन्समध्ये पर्यटकांचा जीव अडकला होता. घटनेची माहिती मिळताच भारतीय जवानांनी लगेच रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. त्यांच्यासोबत यावेळी NDRF, SDRF, जम्मू-काश्मीर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची एक टीम होती, ज्यांनी मिळून या ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. वातावरण बदलत असल्याने आणि भूभागाच्या अडचणीमुळे लोकांना सुखरुप बाहेर काढणं फार कठीण होतं.

व्हिडिओ व्हायरल

रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात आपण जवानांनी पर्यटकांना कसं बाहेर काढलं ते पाहू शकतो. भारतीय लष्कर दोरीच्या मदतीने हवेत लटकलेल्या कॅबिन्सपर्यंत पोहचले आणि मोठ्या हिमतीने त्यांनी ही रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. व्हिडिओत दिसते की, दोरीच्या मदतीनेच एक एक पर्यटकाला खाली उतरवण्यात आले ज्यानंतर पर्यटकांनी हात जोडून भारतीय लष्कराचे आभार मानले.

Successful Large-Scale Rescue Operation at Gulmarg Gondola by Indian Army & Joint Teams Today, a technical snag in the iconic Gulmarg Gondola—one of the world’s highest ropeway systems—stranded approximately 300 tourists in 65 cabins mid-air amid challenging mountainous… pic.twitter.com/easl3OJRRL — IndianArmy in Jammu & Kashmir (Fan Page) (@IndianArmyinJK) May 25, 2026

जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral

माहितीनुसार, हे रेस्क्यू ऑपरेशन अनेक तास सुरु होतं ज्यानंतर हळूहळू सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यात आले. आनंदाची गोष्ट म्हणजे यात एकाही पर्यटकाला गंभीर दुखापत झाली नाही आणि सर्वजण सुखरुप या परिस्थितीतून बाहेर पडले. घटनेचा व्हिडिओ @IndianArmyinJK नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृष्ये पाहिल्यानंतर यूजर्स चांगलेच खुश झाले आणि त्यांनी भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे, धैर्याचे आणि साहसाचे मनभरुन काैतुक केले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video gulmarg ropeway rescue indian army saves 300 tourists stuck midair viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • indian army
  • Jammu Kashimir
  • Rescue team
  • viral news

संबंधित बातम्या

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू
1

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
2

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
3

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
4

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.