Dunki First Review: डंकी (Dunki )थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसाठी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. भारतीय सेन्सॉर बोर्डासमोर झालेल्या स्क्रीनिंगमध्ये डंकीला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
शाहरुख खानचा (Shahrukh khan) डंकी (Dunki ) सध्या चर्चेत आहे. Advance booking सुरू होताच प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. पहिल्याच दिवशी Advanced बुकिंगमध्ये या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यासोबतच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वृत्तानुसार डंकीला दुबई, यूएई येथील व्होक सिनेमाज येथे सेन्सॉर बोर्डाच्या स्क्रीनिंगमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.
भारतीय सेन्सॉर बोर्डासमोर झालेल्या स्क्रिनिंगमध्ये डंकीला स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर डंकीने बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवला, तर शाहरुख खानचा डंकी सिनेमा 2023 मधील सर्वात हिट फिल्म ठरू शकते. अनेक विक्रम शाहरुखच्या नावावर होऊ शकतात.
शाहरुख खानसोबतच डंकीमध्ये अनेक कलाकार आहेत. तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानचा हा पहिलाच चित्रपट आहे. जिओ स्टुडिओज, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रस्तुत, राजकुमार हिरानी आणि गौरी खान निर्मित हा सिनेमा 21 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.