मुंबई: महादेव बेटिंग ॲप प्रकरणाची (Mahadev Betting App Case) चौकशी करणाऱ्या ईडीने अंमलबजावणी संचालनालय ( ED) शुक्रवारी एका बॉलीवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला. या प्रकरणी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी सुरू आहे.
[read_also content=”‘आयुष्मान भारत’ योजनेत जिल्ह्यात केवळ ४ लाखच कार्ड, अजुनही १२ लाख जण वंचित; पात्र लाभार्थी किती आहेत ? https://www.navarashtra.com/maharashtra/in-the-ayushman-bharat-scheme-only-4-lakh-cards-in-the-district-still-12-lakh-people-deprived-how-many-eligible-beneficiaries-are-there-nrdm-466772.html”]
ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशी प्रॉडक्शनच्या (qureshi production house) जागेवर छापे टाकण्यात आले आहेत. कुरेशी प्रॉडक्शनने हा चित्रपट बनवण्यासाठी महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे घेतले होते. कुरेशी प्रॉडक्शन वसीम आणि तबस्सुम कुरेशी चालवतात. बॉलीवूडच्या टॉप स्टार्ससह हा बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात आहे. हे इतर अनेक भाषांमध्ये डब केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
अंधेरी आणि मुंबईतील इतर काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. वसीम कुरेशीची ईडीने चौकशी केली आहे. त्यांच्या प्रवासाचा तपशील आणि पैशांच्या व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भात चौकशी सुरू आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या चित्रपट कलाकारांनी महादेव ॲपपची जाहिरात केली आणि त्याबदल्यात हवालाद्वारे पैसे घेतल्याचा आरोप आहे.
ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म महादेव बुक ॲपची ईडी आणि अनेक राज्यांच्या पोलिस विभागांकडून चौकशी केली जात आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे त्याचे प्रवर्तक आहेत. ही कंपनी दुबईतून चालवली जात होती. ईडीने आरोप केला आहे की कंपनीने बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कद्वारे मनी लाँड्रिंग केले आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आतापर्यंत अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना ईडीचं समन्स मिळालं आहे. या सर्व कलाकारांनी महादेव ॲपपची जाहिरात केल्याचा आणि त्याबदल्यात हवालाद्वारे पैसे घेतल्याचा आरोप आहे.