(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मन धावतया तुझ्याच मागं,या गाण्याने सगळ्यांना वेड लावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून “मन धावतया तुझ्याच मागं, डोलतया तुझ्याचसाठी…” हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मन धावतया तुझ्याचम मागं फेम नक्की आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
हे गाणं आय पॉपस्टार या रिअॅलिटी शोमध्ये मराठमोळ्या गायिका राधिका भिडेने सादर केले आहे. तिचा सुमधूर आणि भावपूर्ण आवाज ऐकून प्रेक्षकांमध्येच नाही, तर परीक्षकांचे डोळे सुद्धा पाणावल्याचे दिसले.
राधिका भिडे ही मूळची रत्नागिरीची असून गेल्या दोन वर्षांपासून ती मुंबईत राहते. गेल्या पाच वर्षांपासून ती संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहे आणि तिच्या कारकिर्दीत अजय-अतुल तसेच ए. आर. रहमान यांचा आदर्श तिच्यासाठी मोठा प्रेरणास्थान आहे. भविष्यात संगीत दिग्दर्शक म्हणून खूप चांगलं काम करायचं असं राधिकाचं स्वप्न आहे.
‘ते सर्वांना माहीत आहे…’, रश्मिका मंदानाने अखेर सोडले मौन, विजयसोबतच्या साखरपुड्याबद्दल केली पुष्टी?
राधिका भिडे ‘आय पॉपस्टार’ या हिंदी संगीत रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे आणि तिच्या “मन धावतया” गाण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. या शोमध्ये स्पर्धकांना विविध थीमवर गाणी सादर करायची असतात. सुंदर हास्य असलेल्या राधिका भिडेच्या सुमधुर आवाजातील ‘मन धावतया’ हे गाणं आता संगीतप्रेमींच्या ओठांवर आहे. ती मंचावर आली आणि आपल्या उपस्थितीने सर्वांनाच जिंकून घेतलं. मराठमोळ्या पारंपारिक पेहरावात सादरीकरण करताना तिनं आपले मधुर गाणं गायले आणि परीक्षकांना तसेच प्रेक्षकांना एका वेगळ्या भावनिक जगात घेऊन गेलं. तिच्या या सादरीकरणामुळे ती प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात राहणार अशी छाप सोडून गेली.






