Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaadi Number 1760 Teaser: पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य

मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे?

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 06, 2025 | 07:05 PM
Gaadi Number 1760 Teaser: पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य

Gaadi Number 1760 Teaser: पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना दिसतेय. सुरुवातीलाच दाखवलेली पैशांनी भरलेली बॅग गायब होते आणि तिथून सुरू होतो रहस्याने भरलेला व विनोदाने सजलेला प्रवास. या बॅगेच्या शोधात अनेक जण एकमेकांवर संशय घेताना, गोंधळात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे रहस्य वाढतेय, तर दुसरीकडे संवाद आणि प्रसंगांमधून विनोदही प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. ही बॅग नेमकी कुठे गेली, हे ४ जुलैला चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

‘इबलिस’ कार्टी करणार रुपेरी पडद्यावर कल्ला, चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे उत्तम कलाकार पाहायला मिळणार असून प्रत्येक पात्राकडे एक गूढ बाजू आहे आणि ती पडद्यावर उलगडताना या कलाकारांचा अभिनय चित्रपटाला अधिकच मनोरंजक बनवतो.

दिग्दर्शक योगिराज संजय गायकवाड म्हणतात, “ ‘गाडी नंबर १७६०’ चित्रपटात प्रेक्षकांना एक मजेशीर गोंधळ पाहायला मिळणार आहे, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. प्रत्येक वळणावर एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. ही विनोदी रहस्यमय कथा प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. टीझरला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटाला ही असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो.”

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘रात सजनाची’ रिलीज, ‘सजना’ चित्रपटातील रोमँटिक गाणं तुम्ही ऐकलंत का ?

निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, “ मराठी प्रेक्षकांसाठी कॉमेडी, मिस्ट्री, ड्रामा, सस्पेन्स असा मनोरंजनाचे पॅकेज असलेला ‘गाडी नंबर १७६०’ चित्रपट घेऊन आलो आहोत. चित्रपटाला एकापेक्षाएक उत्तम कलाकार लाभल्यामुळे चित्रपटाची कथा यांच्या अभिनयाने अजूनच रंगली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होईल, याची मला खात्री आहे.”

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. येत्या ४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Gadi number 1760 multi starrer marathi movie teaser out on social media watch here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar
  • marathi actor
  • marathi actress
  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज;  ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी
2

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..
3

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती
4

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.