Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’ येत्या १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Gondhal marathi movie teaser:गोंधळ या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे, लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 10, 2025 | 04:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टिझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे.

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘गोंधळ’ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात ‘कांतारा’मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठे स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे.

Trisha Krishnan Marriage: तृषा कृष्णनसाठी आई-वडिलांनी पसंत केला जोडीदार, लवकरच तिच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. ‘गोंधळ’ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.

आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यांचा सुंदर संगम यात दिसत आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी वेगळंच रहस्य घेऊन येते, असं टिझरमधून दिसते. काही सेकंदांची ही झलक पाहून या चित्रपटाची स्केल, टेक्निकल क्वालिटी आणि सिनेमॅटिक भव्यता स्पष्ट दिसते.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ‘ ‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि श्रद्धेचं दर्शन आहे. ‘कांतारा’ने जसं आपल्या लोककलेला नवा आयाम दिला, तसाच ‘गोंधळ’ महाराष्ट्रातील श्रद्धा, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची.”

करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करणार हिना खान, पती रॉकीच्या नावाची लावली मेहंदी; शेअर केले फोटो

डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखर असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Gondhal movie to be released on november 14

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध
1

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

वडील बोर्डात, मुलगा फिल्मफेअर विजेता… तर लेक फोर्ब्सच्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये! ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीचा विशेष सन्मान
2

वडील बोर्डात, मुलगा फिल्मफेअर विजेता… तर लेक फोर्ब्सच्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये! ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीचा विशेष सन्मान

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता
3

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”
4

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.