लास वेगास : ‘ग्रॅमी’(Grammy Awards 2022) हा संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पुरस्काराचा वितरण सोहळा लास वेगासमधील एमजीएम ग्रँड मार्की बॉलरुमध्ये नुकताच पार पडला. यावेळी भारतीय वंशाच्या दोन कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. संगीतकार रिकी केज (Ricky Kej) आणि भारतीय अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह (Falguni Shah) यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रिकी केज यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. त्यांना ६४व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागात पुरस्कार मिळाला आहे. ‘डिवाइन टाइड्स’साठी त्यांनी स्टीवर्ट कोपलँडसह हा पुरस्कार पटकावला आहे. या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी परफॉर्म केलं. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के पॉप बँड ‘बीटीएस’ने (BTS) सादर केलेलं परफॉर्मन्स या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं.
Won the Grammy Award today for our album Divine Tides ? Filled with gratitude and love this living-legend standing with me – @copelandmusic . My 2nd Grammy and Stewart’s 6th. Thank you to everyone who ever collaborated, hired, or listened to my music. I exist because of you. pic.twitter.com/Pe4rkOp0ba
— Ricky Kej (@rickykej) April 4, 2022
पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिकी यांनी ट्विट करत जगभरातील चाहत्यांचे आभार मानले. ‘डिवाइन टाइड्स या आमच्या अल्बमसाठी आम्ही ग्रॅमी हा पुरस्कार जिंकला आहे. हा माझा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे तर स्टीवर्टचा सहावा. तुम्हा सर्वांचे खूप आभार’, असं ट्विट रिकी यांनी केलं. गायिका फाल्गुनी शाहला ‘बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम’ विभागात पुरस्कार मिळाला. ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या तिच्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला. फाल्गुनीनेही ट्विट करत तिच्या भावना व्यक्त केल्या.
[read_also content=”अमेरिकेत स्वतःची कंपनी असतानही गावात उभारली आयटी कंपनी ; शेतकऱ्यांच्या मुलांना घरातूनच लाखोंचा पगार https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/set-up-an-it-company-in-the-village-itself-farmers-children-get-lakhs-of-salary-from-home-nrps-264068/”]
‘मी नि:शब्द झाले आहे. ग्रॅमी प्रीमिअरमध्ये सुरुवातीलाच मला परफॉर्म करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. त्यानंतर अत्यंत प्रतिभावान लोकांसोबत काम करत असताना हा पुरस्कार घरी घेऊन जाणं हीसुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी मी रेकॉर्डिंग अकादमीचे आभार मानते’, असं तिने लिहिलं. ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील दिग्गज संगीतकार, गायकांनी हजेरी लावली. ए. आर. रेहमान यांनीसुद्धा या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.