हेरी फेरी ३ : हेरा फेरी चित्रपटाचा भाग पाहिला आणि भाग दुसरा प्रचंड गाजला. या चित्रपटाला आणि या चित्रपटामधील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. असे म्हंटले जात होते की, हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यनची भूमिका कॉमेडी ड्रामा चित्रपट ‘हेरी फेरी ३’ चा तिसरा सिक्वेल पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांनी आतुरतेने वाट पहिली आहे. बाबुराव, राजू आणि श्याम हे त्रिकूट पुन्हा एकदा चित्रपटात धमाल करायला सज्ज झाले आहे. याआधी या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी अक्षय कुमारची वर्णी लागल्याचे वृत्त होते, मात्र आता परेश रावल यांनी त्याचे खंडन केले आहे त्यांनी स्वतः याबाबतीत सांगितले आहे.
‘हेरा फेरी’मध्ये ‘बाबुराव’ची भूमिका साकारून प्रेक्षकांना हसण्याचा पूर्ण डोस देणारा परेश रावल या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यनची निवड करण्यात आल्याचा खुलासा परेश रावल यांनी केला आहे, अभिनेत्याची निवड ‘राजू’साठी नसून अन्य कोणत्या तरी भूमिकेसाठी करण्यात आली होती असे परेश रावल यांनी सांगितले.
न्यूज १८ शी बोलताना दिलेल्या मुलाखतीमध्ये परेश रावल म्हणाले की, ‘हेरा फेरी ३’ मध्ये कार्तिक आर्यनची भूमिका वेगळी होती. कार्तिकची व्यक्तिरेखा राजू याची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. परेश पुढे म्हणाले, ‘कार्तिकची भूमिका राजूपेक्षा वेगळी होती आणि त्यात वेगळी ऊर्जा होती. त्याच्या पात्राचा आधारही वेगळा होता. प्रतिक्रियेला घाबरू नये आणि लोकांनी एकदा चित्रपट पाहिला की ते सर्व प्रतिक्रिया विसरतात.
परेश रावल यांनी अशा प्रकारे पुष्टी केली की कार्तिक आर्यनला गेल्या वर्षी ‘हेरा फेरी ३’ साठी कास्ट करण्यात आले होते परंतु या बातमीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि खूप विचार केल्यानंतर निर्मात्यांनी मूळ कलाकारांसह फ्रेंचायझी चित्रपट पुढे जाण्याचा निर्णय घेतला. परेश रावल व्यतिरिक्त अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे.