Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कटिंग चहा आणि बन-मस्काचा फॅन झाला ‘स्पायडरमॅन’ टॉम हॉलंड! व्हिडिओ व्हायरल; भारतीय चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Tom-Holland : क्रिस्टोफर नोलन यांच्या 'द ओडिसी'च्या मुंबई प्रीमियरपूर्वी टॉम हॉलंडने कटिंग चहा आणि बन-मस्काचा आस्वाद घेतला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 09:10 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tom-Holland : हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या आगामी ‘द ओडिसी’ या चित्रपटाचा भारतीय प्रीमियर शनिवारी मुंबईत पार पडला. या खास सोहळ्यासाठी नोलन यांच्यासह अभिनेता टॉम हॉलंड आणि मॅट डॅमन उपस्थित होते. मात्र रेड कार्पेटवर पोहोचण्यापूर्वी या तिघांनी मुंबईतील एका कॅफेमध्ये थांबत कटिंग चहा, बन-मस्का आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला.

युनिव्हर्सल पिक्चर्स इंडियाने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत लिहिले, “‘द ओडिसी’च्या मुंबई प्रीमियरपूर्वी छोटासा चहा ब्रेक. मोठ्या संध्याकाळीपूर्वी आधी चहा!” या फोटोंमध्ये नोलन, टॉम हॉलंड आणि मॅट डॅमन अगदी देसी अंदाजात चहा आणि बन-मस्काचा आनंद घेताना दिसत आहेत. कॅफेमधील उपस्थितांनीही या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ टिपले.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्याने लिहिले, “रेड कार्पेटच्या आधी कटिंग चहाची सुट्टी!” तर दुसऱ्याने म्हटले, “टॉम हॉलंड इतका गोंडस दिसतोय.” एका चाहत्याने ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’मधील पवित्र प्रभाकरची आठवण काढत, “टॉमला चहा पिताना पाहून स्पायडरमॅन इंडियाची आठवण झाली,” अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका युजरने गंमतीत लिहिले, “पहिल्याच घोटात तोंड भाजलं असेल!”

दरम्यान, काही चाहत्यांनी रॉबर्ट पॅटिन्सन भारतात का आला नाही, अशीही उत्सुकता व्यक्त केली.

‘द ओडिसी’मध्ये मॅट डॅमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, रॉबर्ट पॅटिन्सन, ल्युपिटा न्योंगो, सामंथा मॉर्टन, झेंडाया आणि शार्लिझ थेरॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Quick tea stop before The Odyssey Mumbai Premiere A Big night awaits, but chai comes first!#OdysseyMumbaiPremiere pic.twitter.com/bzNSjIcQG6 — Universal Pictures India (@UniversalIND) July 11, 2026

 

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा जाळं; पावलापावला मृत्यूचे सावट, थरथरवणारा थरार

प्रीमियरदरम्यान क्रिस्टोफर नोलन यांनी सांगितले की, “‘टेनेट’चा प्रीमियर भारतात करायचा होता, कारण त्याचे चित्रीकरण मुंबईत झाले होते. मात्र महामारीमुळे ते शक्य झाले नाही. आता ‘द ओडिसी’च्या निमित्ताने भारतात येण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.”

टॉम हॉलंडनेही या चित्रपटाबद्दल बोलताना, “‘द ओडिसी’ हा चित्रपट म्हणजे सिनेमावर आणि प्रेक्षकांवर असलेलं प्रेम व्यक्त करणारा चित्रपट आहे,” असे सांगितले.

भारतीय प्रीमियरमध्ये ‘द ओडिसी’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती मोठी कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tom Holland having tea with Christopher Nolan and Matt Damon today in Mumbai, India pic.twitter.com/Cnfe0Z6GDB — best of tom holland (@thollandrchives) July 11, 2026


Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Web Title: Spider man tom holland falls in love with cutting chai and bun maska video goes viral indian fans react hilariously

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

ना मोठा सोहळा, ना गाजावाजा! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा साधेपणाने पार पडला विवाहसोहळा; फोटो व्हायरल
1

ना मोठा सोहळा, ना गाजावाजा! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा साधेपणाने पार पडला विवाहसोहळा; फोटो व्हायरल

Adarsh Baal Vidyalaya Series: मोडकळीस आलेल्या शाळेची मजेशीर कहाणी; आदर्श बाल विद्यालय’ची रिलीज डेट जाहीर
2

Adarsh Baal Vidyalaya Series: मोडकळीस आलेल्या शाळेची मजेशीर कहाणी; आदर्श बाल विद्यालय’ची रिलीज डेट जाहीर

Simulacra movie: आठवणी बदलल्या तर प्रेम टिकेल का? ‘सिम्युलाक्रा’मधून उलगडणार भविष्यकालीन प्रेमकथा
3

Simulacra movie: आठवणी बदलल्या तर प्रेम टिकेल का? ‘सिम्युलाक्रा’मधून उलगडणार भविष्यकालीन प्रेमकथा

Marathi Serial : पहिल्या पावसात रंगणार केदार-तारिणीचा रोमँटिक क्षण, शिवानी सोनारने सांगितला शूटिंगचा खास किस्सा
4

Marathi Serial : पहिल्या पावसात रंगणार केदार-तारिणीचा रोमँटिक क्षण, शिवानी सोनारने सांगितला शूटिंगचा खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.