Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इबलिस’ कार्टी करणार रुपेरी पडद्यावर कल्ला, चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला की आता लढाई होणार…त्यानंतर ‘इबलिस’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 06, 2025 | 06:40 PM
एक शाळा, एक बंड अन् इतिहासाशी झालेली गाठ; ‘इबलिस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

एक शाळा, एक बंड अन् इतिहासाशी झालेली गाठ; ‘इबलिस’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला की आता लढाई होणार…त्यानंतर ‘इबलिस’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये किल्ला, शाळेच दप्तर, दुर्बीण, दूरध्वनी आणि भगवा झेंडा विशेष लक्ष वेधून घेतं आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांना काहीतरी हटके पाहण्याची पर्वणी लवकरचं मिळणार आहे.

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘रात सजनाची’ रिलीज, ‘सजना’ चित्रपटातील रोमँटिक गाणं तुम्ही ऐकलंत का ?

तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन आणि सार्थी एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘इबलिस’ हा चित्रपट येत्या २० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पालकांना आणि शिक्षकांना गोंधळात टाकून इतिहास आठवायला लावणारी काही इबलिस मुलं येत आहेत तुम्हाला भेटायला. ही इबलिस कार्टी एक मोहीम आखतात आणि ती मोहीम तडीस नेण्यासाठी आपल्या विचारांशी समरस होऊन येणाऱ्या कठीण परिस्थितीवर कशी मात देतात. त्याची अनसुनी कहाणी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

४० वर्षीय रणबीर कपूरचा क्लीन शेव्ह लूक पाहिलात का? अभिनेत्याच्या लूकवर नेटकरी फिदा

बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.

जबरदस्त ट्रान्स्फर्मेशन लूकमध्ये धनुषला ओळखणे कठीण, ‘तेरे इश्क में’च्या सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल!

दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी ‘इबलिस’ चित्रपटाविषयी सांगतात, ” ‘इबलिस’ हा उर्दू शब्द आहे. अतिबुद्धिमान आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लहान मुलांना गावाकडे इबलिस म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात अशीच ११ लहान मुल आहेत त्यामुळे या चित्रपटाचं नाव इबलिस ठेवलं आहे. २०१७ – २०१८ मध्ये माझ्या बंदुक्या या चित्रपटाला जे यश मिळाल, अनेक पुरस्कार मिळाले, भरभरून प्रेम मिळाल. त्यामुळे सामाजिक विषयांना धरून मनोरंजक चित्रपट करावा अस मी ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये कसे रुजवू शकतो हा विचार मी करत होतो. मग मी ६ महिने रिसर्च करून अनेक वर्कशॉक घेवून तसेच या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे यांच्याशी चर्चा करून हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. आणि हा चित्रपट येत्या २० जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत जरूर पहावा.”

Web Title: Iblis marathi movie poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
1

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
2

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता
3

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज
4

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.