(फोटो सौजन्य - Instagram)
आनंद एल रॉय यांच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील धनुष आणि क्रिती सेननच्या लूक टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे. ज्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘रांझणा’शीही जोडले जात आहे. तथापि, निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की ‘तेरे इश्क में’ हा ‘रांझणा’चा सिक्वेल नाही. आता चित्रपटाच्या सेटवरून धनुषच्या लूकचे काही फोटो लीक झाले आहेत. त्यानंतर धनुषच्या व्यक्तिरेखेबद्दल अंदाज बांधले जात आहेत. धनुषचा सेटवरील हा लूक पाहून चाहते चकीत झाले आहे. अभिनेत्याची नक्की काय भूमिका असणार हे पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवी घेणार नवा अवतार, मालिकेच्या कथानकाला मिळणार एक नवे वळण…
धनुष हवाई दलाच्या गणवेशात दिसला
शूटिंगमधून समोर आलेले धनुषचे फोटो पाहून असे दिसून येत आहे की धनुष चित्रपटात भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये धनुष हवाई दलाच्या गणवेशात आणि लांब मिशीमध्ये दिसत आहे. धनुषचा हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
चित्रपटात धनुष शंकरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि क्रिती मुक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या चित्रपटातील धनुषच्या पहिल्या लूक टीझरमध्ये अभिनेता लांब केस आणि दाढीसह दिसला होता. तथापि, त्यानंतर धनुष आणि क्रितीचे शूटिंगमधील आणखी काही फोटो समोर आले आहेत. आता धनुषचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जे चित्रपटातील त्याची भूमिका स्पष्ट करत आहे.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
जेव्हा आनंद एल रॉय यांचा ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट ‘रांजना’चा सिक्वेल असल्याचे म्हटले जात होते, तेव्हा निर्मात्यांनी स्पष्ट केले होते की चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. चित्रपटातील संगीत ए.आर. रहमान यांचे आहे आणि गीते इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत. ‘तेरे इश्क में’ या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.