विनोदी सिनेमांचा विषय निघाला की ‘हेरा फेरी’ या चित्रपटाचं नाव पुढे आल्याशिवाय राहत नाही. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना आजही आवडतात. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोण काम करणार याविषयी लोकांना उत्सुकता आहे. या सिनेमातील अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत चर्चा सुरु आहे. अशातच ‘हेरा फेरी-३’ (Hera Pheri 3) या सिनेमात कार्तिक आर्यन दिसणार असल्याची निर्मात्यांनी माहिती दिली आहे.
Yes it’s true . https://t.co/JtdI4Yp2nb
— Paresh Rawal (@SirPareshRawal) November 11, 2022
[read_also content=”एलॉन मस्कच्या फॅन्सनी बनवला त्यांचा ३० फूटांचा पुतळा, खर्चाचा आकडा ऐकाल तर बसेल धक्का https://www.navarashtra.com/world/elon-musk-30-feet-statue-made-in-canada-nrsr-343960/”]
गेल्या अनेक दिवसांपासून ‘हेरा फेरी-३’ या सिनेमात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा होत होती. अखेर यासंदर्भात परेश रावल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटरवर एका चाहत्याने परेश रावलला विचारलं, कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी-३’ या सिनेमात दिसेल का? यावर परेश रावल यांनी,“होय.. हे खरं आहे”. असं उत्तर दिलं आहे.