सौजन्य- सोशल मीडिया
‘कौन बनेगा करोडपती १६’ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय टेलिव्हिजन शोपैकी एक आहे. या शोच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे. होस्ट अमिताभ बच्चन यांचे या शोमधील किस्से अनेकदा चर्चेचा विषय असतो. अनेकदा ते हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांसोबत त्यांच्या करिअरमधल्या गंमतीजमती शेअर करत असतात. शिवाय कधी कधी बिग बी किस्से सांगताना लोटपोट हसतात तर कधी कधी ते भावुकही होतात. अशातच केबीसीच्या हॉटसीटवर अलका सिंग नावाची एक स्पर्धक आली होती. तिने बिग बींकडे हटके मागणी केली आहे. तिची ही मागणी ऐकून बिग बींसह सर्वच लोकं हैरान झालेय.
‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनमध्ये ‘इंडिया चॅलेंजर वीक’ होता. ‘जल्दी ५’ या नवीन सेगमेंटचा या खेळात समावेश केला गेला आहे. या दरम्यान अलका सिंग यांना हॉट सिटवर खेळण्याची संधी मिळाली. २४ वर्षीय अलका पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्तर म्हणून काम करते. ती फास्टेस्ट फिंगरच्या पहिल्या फेरीतील दोन विजेत्यांपैकी एक होती आणि तिला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. अलकाने शोमध्ये शानदार गेम खेळून 3,20,000 रुपये कमावले. खेळादरम्यान होणाऱ्या चर्चांदरम्यान अलका यांनी बिग बींकडे हटके मागणी केली.
अलकाने बिग बींना विचारले की, मी तुमची दाढी ओढू शकते का ? तर अमिताभ बच्चन म्हणतात, तू कधी तुझ्या भावाच्या किंवा वडिलांच्या दाढीला हात नाही लावला ? तर अलकाने उत्तर दिले की, “माझ्या वडिलांना आणि भावाला क्लीन शेव्ह ठेवायला आवडत असल्याने मला तसे करता येत नाही.” त्यावर अमिताभ बच्चन यांनी अलकाला मिश्किल टोमणा मारत उत्तर दिले की, “ज्यावेळी तुमचा भाऊ ८२ वर्षांचा होईल, त्यावेळी त्याची दाढीदेखील पांढरी होईल. त्यावेळी त्याच्या दाढीला तू हात लाव.” पुढे ते म्हणाले, “ज्यावेळी एपिसोड संपत येईल, त्यावेळी तुम्ही दाढीला हात लावू शकता.” मात्र, अलका यांची हटके मागणी बिग बींसह सर्वच प्रेक्षक अचंबित झाले.
हे देखील वाचा – IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ‘स्त्री 2’चे कलाकार आघाडीवर!
अलका सिंग जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसण्यासाठी आली होती, तेव्हा ती भावूक झाली होती. बिग बींनी तिला डोळे पुसण्यासाठी टिश्यू पेपर देखील दिला. जेव्हा अनेक स्पर्धक हॉटसीटवर बसतात तेव्हा अनेक जणं भावुक होतात. त्यावर अलका यांनी मी रडले नाही, असे म्हटले. त्यावर अमिताभ बच्चन यांनी लगेच अलकाची माफी मागितली. बिग बी असं म्हणताच, अलका यांनी त्यांना ‘गुड बॉय’ म्हटलं. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना सांगितले की, मी ८२ वर्षांचा असून तिने मला “शहाणा मुलगा”म्हटलं.