गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आला होता. त्यांना Y वरून X सुरक्षा देण्यात येते. यापूर्वी बिग बींना मुंबई पोलिसांकडून सामान्य सुरक्षा मिळत होती.
‘कौन बनेगा करोडपती’चं सध्या १६वं पर्व सुरू आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वात गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समोर दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी असणार आहेत. प्रेमस्वरूप हे पेशाने SSBचे निवृत्त जनरल अधिकारी होते. त्यांचे KBCमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे असललेले स्वप्न अखेर आता पूर्ण होणार आहे. प्रेमस्वरूप स्वतः एक उत्तम टेनिसपटू आहेत. त्यांचा आवडता खेळ टेनिस आहे. बिग बी बच्चन यांच्यासोबत बोलत असताना प्रेमस्वरूप यांनी आपले टेनिस-प्रेम व्यक्त केले.
‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, भावुक पोस्ट करत मागितली माफी
टेनिसबद्दल सांगत असताना प्रेमस्वरूप यांनी शोमध्ये सांगितले की, त्यांना एकदा टेनिस टूर्नामेंटमध्ये प्रेक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. त्यावर हसून अमिताभ बच्चन म्हणाले, “मला सेरबियनचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच फार आवडतो. त्याचा खेळ अप्रतिम आहे आणि तो इतर खेळाडूंची नक्कलही छान करतो.” बोलण्याच्या ओघात, बिग बींनी आपल्या न्यूयॉर्क दौऱ्याचा एक गंमतीदार पण अविस्मरणीय किस्साही सांगितला. ते न्यूयॉर्कला टेनिस टूर्नामेंट बघायला गेले होते. ते म्हणाले, “मी तिकडे काही भारतीयांसोबत बसलो होतो. त्या लोकांनी मला ओळखले आणि ते माझ्याकडे ऑटोग्राफ मागू लागले. पण, त्यानंतर जे झाले, ते फार आश्चर्यकारक होते!
‘पुष्पा 2’ चे किसिक गाणे रिलीज होताच श्रीलीला झाली ट्रोल? चाहत्यांना आली सामंथाची आठवण!
जवळच बसलेल्या दोन अमेरिकन महिलांनी काही वेळ माझ्याकडे पाहिलं आणि त्या म्हणाल्या, “तुम्हाला भेटून आनंद वाटला, विजय अमृतराज.” बिग बी हसत हसत पुढे म्हणाले, “त्यांना वाटले होते की मी माजी भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज आहे. कारण एक तर मी भारतीय आहे आणि आमची उंची तशी सारखीच आहे. आणि जर लोकांनी मला गराडा घातला असेल, तर मी कुणी प्रसिद्ध टेनिस स्टार असलो पाहिजे. मी हसून त्यांना उत्तर दिले की, “मी कुणी टेनिसपटू नाही. मी फक्त इथे मॅच बघायला आलो आहे. मी खरा कोण आहे, हे काही मी त्यांना सांगितले नाही.” हा गंमतीदार किस्सा ऐकून स्पर्धक प्रेमस्वरूप आणि उपस्थित प्रेक्षकांचेही खूप मनोरंजन झाले. मात्र या किश्शातून बिग बी बच्चन यांची विनम्रता आणि अशा परिस्थितीत चमकलेली त्यांची विनोदबुद्धी पुन्हा एकदा दिसून आली.