ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची गाणी जगभर प्रसिद्ध आहेत. लतादीदींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. गायक आणि रॅपर ड्रेकच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये लतादीदींच्या ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ड्रेकनं (Drake Concert) सादर केल्याचं पाहायला मिळालं. काहींनी या व्हिडिओला पसंती दर्शवली तर काहींनी टीका केली आहे.
काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओला कमेंट करुन ड्रेकला ट्रोल केलं आहे. या व्हायरल व्हिडिओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘मी या शोमध्ये होतो, असं काही झालं नाही.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘मी रिमिक्स संगीताचा चाहता आहे. पण हे मला नाही आवडलं.’
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बंगळुरुत नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट कांस्य पुतळ्याचं अनावरण https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-unveils-108-feet-bronze-statue-of-nada-prabhu-kempegowda-in-bangalore-nrps-343618/”]
‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील गाणं लोक आजही आवडीनं ऐकतात. सलमान खान आणि माधुरी दिक्षितवर चित्रित झालेलं हे गाणं आहे. हे गाणं लता मंगेशकर आणि एसपी बालासुब्रमण्यम यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार देव कोहली हे आहेत.