तब्बल ३२ तासांचा प्रवास करून गिरीजा ओकने बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना दिला मोलाचा सल्ला
आज राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, राजकारणी आणि बिझनेसमन्सपर्यंत सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजल्यापर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गिरीजा ओकने आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. अभिनेत्रीने न्यूझीलंडहून मुंबईपर्यंत ३२ ते ३६ तासांचा प्रवास करून गिरीजाने पुण्यात मतदान केलं आहे.
कडक बंदोबस्तात अभिनेता सलमान खानने केले मतदान, धमकीनंतरही घाबरला नाही भाईजान!
मतदान केल्यानंतर अभिनेत्री गिरीजा ओक हिने माध्यमांसोबत संवाद साधला. माध्यमांसोबत संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली, “मी मतदान केलं, असं लोक आजकाल एकमेकांना सांगतात. कारण इतर लोकं करत नाहीत. कारण, मला असं वाटतं, वेगळी काहीच गोष्ट नाही. प्रत्येकाने मतदान करायलाच हवं. मी आज न्यूझीलंडहून ३२ तास प्रवास करून भारतात आले. त्यानंतर पुन्हा चार-पाच तासांचा प्रवास करून पुण्यात येऊन मतदानाला आले. त्यामुळे कदाचित तुमचं काहीही कारण नसू शकतं.”
दिलेल्या मुलाखतीत पुढे गिरीजा ओक म्हणाली की, “प्रत्येकाची हीच अपेक्षा असते की, आपल्या नेत्यांनी जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी पूर्ण करावीत. मी ज्या परिसरात राहते, तिथल्या सगळ्यांचं उमेदवारांबद्दल मला बऱ्यापैकी माहित आहे. त्यामुळे माझा मतदान करण्याचा निर्णय खूप क्लिअर होता. पण, मतदानाची टक्केवारी खूप दुःखद आहे. ऐरवी आपण हे बरोबर नाही ते बरोबर नाही हे बोलायला आवडतं. पण, मतदानाचा हक्क बजावला नाही तर बोलण्याचा हक्क आपल्याला नसु शकतो. तर मला असं वाटतं मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. कारण त्याला पर्याय नाहीये. मतदानाच्या दिवशी अनेकजणं खूप प्रेमाने ट्रीप प्लॅन करतात. हे मला अजिबात पटतं नाही. पण, याबद्दल लोकांना कसं सांगावं कळतं नाही. मी म्हटलं तसं ३२ ते ३६ तास प्रवास करून मी मतदानाला आले. मतदानासाठी काहीच कारण द्यायला नाही पाहिजे. तुम्ही मतदान करायलाच पाहिजे.”
अपघातानंतर कश्मिराचा दुखापतीचा फोटो व्हायरल, म्हणाली- ‘मला तेव्हाही वेदना होत होत्या आणि अजूनही…’