Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50 वर्षाची ‘मुन्नी’ पुन्हा बदनाम, 17 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसह एअरपोर्टवर स्पॉट

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉलीवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आली आहे. एका "मिस्ट्री मॅन" सोबत पहिल्यांदा एका कॉन्सर्टमध्ये पाहिले गेले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 27, 2025 | 08:08 PM
पुन्हा एकदा मलायकाचे नाव चर्चेत (फोटो सौजन्य - Instagram)

पुन्हा एकदा मलायकाचे नाव चर्चेत (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • मलायका अरोरा पुन्हा प्रेमात 
  • मिस्ट्री मॅनसह एअरपोर्टवर पुन्हा स्पॉट 
  • १७ वर्षांनी लहान असल्याच्या चर्चा 
बहुतेक लोकांसाठी, संगीत कार्यक्रमात जाणे किंवा विमान प्रवास करणे ही एक सामान्य घटना आहे. पण जर तुम्ही मोठे स्टार असाल किंवा मलायका अरोरासारख्या बॉलिवूडमधील सर्वात हॉट महिलांपैकी एक असाल, तर तुमची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनू शकते. अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर, मलायका अरोरा सर्वांच्या नजरेत आहे. 

चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की ही अभिनेत्री कोणाला डेट करत आहे आणि ती कोणासोबत फिरत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मलायका प्रेमात असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे आणि यावेळी तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. पहिल्यांदा कॉन्सर्टमध्ये दोघांना पाहण्यात आले आणि आता एअरपोर्टवर मलायकाच्या मागून काही अंतरावर तिचा बॉयफ्रेंड येताना दिसला, त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू असल्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे. 

या अफवा कधीपासून पसरत आहेत?

मलायकाचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे, मात्र तिने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही आणि जे आपल्या मनाला वाटेल तेच ती करत आली आहे. २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत एनरिक इग्लेसियासच्या संगीत कार्यक्रमात मलायका उपस्थित राहिली तेव्हा ती नात्यात असल्याची ही चर्चा सुरू झाली. तिच्यासोबत एक ‘मिस्ट्री मॅन’ दिसला होता आणि सर्वांनाच मल्ला कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. शो दरम्यान दोघे गप्पा मारताना आणि एकत्र येताना वा जाताना दिसले आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले. मात्र आता दुसऱ्यांना पुन्हा एकदा एअरपोर्टवर असेच दृष्यं दिसले आहे. 

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क

मास्क घालून लपवला चेहरा 

दुसऱ्या घटनेनंतर या प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी, मलायका अरोरा पुन्हा त्याच पुरुषासोबत मुंबई विमानतळावर दिसली. त्यांनी एकत्र फिरणे टाळले, पण तरीही व्हिडिओग्राफरच्या कॅमेऱ्यात मात्र दोघेही कैद झाले आहेत. मलायका आधी बाहेर पडली आणि त्यानंतर तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड असणारा व्यक्ती एअरपोर्टवरून बाहेर आला. त्याने मास्कने चेहरा अर्धवट लपवला, त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर दोघेही एकाच कारमधून निघून गेले असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

“अर्जुनपेक्षा भारी..” Enrique च्या कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरा दिसली ‘मिस्ट्री मॅन’सोबत; नव्या नात्याची चर्चा सुरू!

हर्ष मेहता कोण आहे?

या गूढ माणसाबद्दल कोणतीही ठोस माहिती नसली तरी, मीडिया पोर्टल्स वेगवेगळी विधाने करत आहेत. डीएनए इंडियाच्या वृत्तानुसार, हा माणूस ३३ वर्षीय हिरे व्यापारी हर्ष मेहता आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑनलाइन चाहते तो व्यापारी नसून मलायकाचा व्यवस्थापक आहे असे मानतात. कोणतेही अधिकृत विधान न करता, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. सध्या, मलायका अरोरा किंवा हर्ष मेहता (अजूनही नाव जाहीर करण्यात आलेले नाही) या दोघांनीही डेटिंगच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: Malaika arora spotted with rumoured boyfriend harsh mehta who is 17 years younger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:08 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Malaika Arora
  • Malaika Arora Photos

संबंधित बातम्या

गुजराती चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’ कामगिरी! 50 लाखांच्या बजेटमध्ये 74 कोटींची कमाई, आता हिंदीतही होणार डब
1

गुजराती चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’ कामगिरी! 50 लाखांच्या बजेटमध्ये 74 कोटींची कमाई, आता हिंदीतही होणार डब

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार
2

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

World TV Day: सामाजिक एकता वाढविण्यात टीव्हीचे योगदान अधिक – व्ही. आर. हेमा – चीफ चॅनेल ऑफिसर,  झी मराठी
3

World TV Day: सामाजिक एकता वाढविण्यात टीव्हीचे योगदान अधिक – व्ही. आर. हेमा – चीफ चॅनेल ऑफिसर, झी मराठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.