(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिली आहे. काही वर्षांपूर्वीच तिचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर मलायका १२ वर्षांनी लहान अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असून, सुरुवातीला ट्रोल झाल्यानंतरही त्यांनी आपलं नातं कायम ठेवलं होतं. मात्र, गेल्या वर्षी मलायका आणि अर्जुनचं नातं तुटल्याची चर्चा समोर आली, ज्याने सर्वांना धक्का बसला.
आता पुन्हा एकदा मलायका चर्चेत आली आहे. पण यावेळी एका ‘मिस्ट्री मॅन’मुळे!काही दिवसांपूर्वी ती हॉलिवूड गायक एनरिक्यू इगलिसिसच्या कॉन्सर्टला पोहोचली होती. या कॉन्सर्टला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सोशल मीडियावर या कॉन्सर्टचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत
त्यातील एका व्हिडिओमध्ये मलायका एका अज्ञात व्यक्तीसोबत हसताना, नाचताना आणि गाताना दिसली. त्या व्यक्तीबरोबर तिला पाहून नेटकऱ्यांनी लगेचच अंदाज लावायला सुरूवात केली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Rohit Arya Case: ‘त्या दिवशी रोहित आर्यला भेटले अन्..”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची मंजूचा धक्कादायक खुलासा
काहींनी दावा केला आहे की अर्जुन कपूरपासून वेगळं झाल्यानंतर मलायकाने पुन्हा नवीन नातं सुरू केलं आहे आणि तो ‘मिस्ट्री मॅन’ तिचा नवा बॉयफ्रेंड असू शकतो. एका युजरने लिहिलं, “शेवटी मलायकाने आपला स्टँडर्ड वाढवला, अर्जुन आणि अरबाजपेक्षा हा माणूस खूपच चांगला दिसतो.” तर दुसऱ्याने म्हटलं, “ नवीन D…ost दिसतोय.” काहींनी तिच्या वयावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण एका फॅनने प्रत्युत्तर दिलं, “52 वर्षांचा पुरुष तरुण मुलीसोबत डेट करत असेल, तर कुणी काही बोलत नाही, पण एका महिलेने असं केल्यावर तिला ट्रोल केलं जातं, ही मानसिकता लाजिरवाणी आहे.”






