शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या 'या' अटी, तर युनूसवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Sheikh Hasina Return To Bangladesh : ढाका : शेख हसीना (Sheikh Hasina) बांगलादेशात परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. तसेच त्यांनी बांगलादेशच्या अंमतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.
‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हसीना यांनी म्हटले की, त्या बांगलादेशात परतण्यास तयार आहे. परंतु त्यांनी देशात पुन्हा लोकशाही पुनर्संचयित करण्यास सांगितली आहे. तसेच त्यांनी अवामी लीगवरील बंदी उठवण्याची आणि निष्पक्ष, समावेश निवडणुकांचा मादगणी केली आहे. तरच त्या मायदेशी परतणार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे.
दरम्यान हसीना यांनी पुन्हा एखदा युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हसीना यांनी बांगलादेश आणि भारतातील बिघडलेल्या संबंधासाठी युनूस यांना जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी युनूसच्या राजवटीत कट्टरपंथीं शक्तीं राज करत असल्याचा दावा केला आहे. हसीना यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश आणि भारतमधील संबंध युनूस यांच्या मुर्ख आणि चुकीच्या धोरणांमुळे बिघडले आहे. परंतु त्या बांगलादेशात परतल्या तर पुन्हा संबंध सुधारतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. हसीना यांनी युनूस यांनी संविधानांच्या तरतूदींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे, तसेच त्यांनी देशात कट्टरपंथींच्या हिंसाचाराला न रोखल्याचा आरोपही केला आहे.
तसेच हसीना यांनी भारताचे आभार मानले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे अवामी सरकार पडले. तेव्हा हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. त्यांनी म्हटले की, मला आश्रय दिल्याबद्दल मी भारत सरकार आणि येथील लोकांची आभारी आहे.
बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. परंतु यापूर्वीच देशाच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. हसीना यांच्या आरोपांनी पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे.
या सर्व घडामोडींंदरम्यान बांगलादेशात पुन्हा ऑगस्ट २०२४ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी युनूस सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयामुळे, ज्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि शीरीरिक शिक्षण विषयांच्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत, यामुळे तीव्र आंदोलन पेटले आहे. तसेच १९९० पासून शिक्षकांच्या पगारात वाढ न झाल्याने, बेरोजगारी, वाढता हिंसाचार यांमुळे देखील रोषाचे वातावरण आहे.






