पाकिस्तान वि श्रीलंका(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs SL 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेनंतर यजमान पाकिस्तान संघ मंगळवारी घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिककेची विजयी सुरुवात केली आहे. रावळपिंडी येथे खेळवण्यात आलेल्या. पहिल्या सामन्यात, यजमान पाकिस्तानने रोमांचक सामन्यात श्रीलंकेला ६ धावांनी धूळ चारली आणि मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. पाकिस्तानच्या विजयाचा नायक सलमान आघा ठरला. ज्याने नाबाद १०५ धावा फटकावल्या. तर श्रीलंकेकडून तळाच्या क्रमावर आलेल्या वानिंदू हसरंगाची ५९ धावांची खेळी व्यर्थ गेली. तथापि, श्रीलंकेला पराभूत करून पाकिस्तानने जवळजवळ ३६ वर्षांपूर्वी केलेला पराक्रम पुन्हा एकदा केला आहे.
हेही वाचा : IND vs SA Test series : शुभमन गिलला विश्वविक्रम मोडण्याची संधी! रिकी पॉन्टिंगला टाकणार मागे?
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला विजय खास ठरला आहे. कारण तो पाहुण्या संघाविरुद्ध मिळवलेला संयुक्तपणे सर्वात कमी फरकाने विजय ठरला. यापूर्वी, १९८९ मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला फक्त ६ धावांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे या ६ धावांनी मिळवलेल्या पहिल्या जवळच्या विजयाचा भारतासोबत जवळचा संबंध आहे. पाकिस्तानने लखनौमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते. तो नेहरू कप सामना होता. त्या सामन्यात, पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानच्या नाबाद ८४ धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेकडून अरविंद डी सिल्वा (८३) आणि हसन तिलकरत्ने (७१) यांच्या खेळी व्यर्थ गेल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध संयुक्त ६ धावांनी विजय मिळवण्यात यश आले होते.
पाकिस्तानच्या संघाने मंगळवारी ६ धावांनी रोमांचक विजय मिळवून, श्रीलंकेची तीन सामन्यांची विजयी मालिका खंडित केली आहे. तर गेल्या ११ सामन्यांमधील हा श्रीलंकेचा चौथा पराभव ठरला आहे. सध्या, पाकिस्तानने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. ज्यामुळे मालिका आता रोमांचक वळणार आली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन एकदिवसीय सामने उद्या, १३ तारखेला आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवण्यात येणार आहे.
उदयोन्मुख क्रिकेटपटू विहान मल्होत्राची मंगळवारी आगामी तिरंगी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली, ज्यामध्ये भारत ‘ब’ आणि अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघ देखील सहभागी होतील. हैदराबादचा आरोन जॉर्ज १७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील ‘ब’ संघाचे नेतृत्व करणार आहे.






