Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail

प्रियाच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर कोणकोणते कलाकार कॅन्सरने गेले याबाबतचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्युब चॅनेल चुकीची माहिती देत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 09, 2025 | 02:41 PM
“माझ्या मृत्यूची बातमी…”; अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, प्रिया मराठेच्या फोटोबरोबर होतं युट्यूब Thumnail
Follow Us
Close
Follow Us:
  • प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाची अफवा
  • सोशल मीडियावरील अफवांबाबत अभिनेत्याचा संताप
  • माझ्याच निधनाची बातमी मीच पाहिली
Abhijeet Chavan Marathi News : अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला हा खूप मोठा धक्का आहे. प्रियाला जाऊन काही दिवस झाले तरीही अजून ही प्रेक्षक आणि सहकलाकारांना या धक्कातून सावरणं अजूनही कठीण होत आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार हे कॅन्सरने गेले. अभिनेत्री रसिका जोशी, अतुल परचुरे आणि आता प्रिया मराठे बऱ्य़ाच या आणखी अशा बऱ्याच कलाकरांचा कॅन्सरने जीव गेला. प्रियाच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर कोणकोणते कलाकार कॅन्सरने गेले याबाबतचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्युब चॅनेल चुकीची माहिती देत आहे. यातच आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या जाण्याची खोटी बातमी युट्युबवर गेली. याचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत या अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.

कोण आहे का अभिनेता ?

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत चव्हाण याच्या निधनाच्या खोट्य़ा बातम्या युट्युबवर व्हायरल झाली. या सगळ्यावर अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. एका युट्यूब चॅनेलने व्हिडीओच्या थंबनेलमध्ये असं म्हटलं आहे की, मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले. या व्हिडीओवर क्लिक केल्यावर आशिष वारंग यांच्या निधनाची बातमी होती. केवळ व्ह्यूज वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत क्रुर कृत्य आहे असं म्हणत अभिजीतने संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाला अभिजीत चव्हाण ?

प्रिया मराठेच्या फोटोसह माझा फोटो एका युट्यूबच्या व्हिडीओचा थंबनेल होता. त्यावर असं लिहिलं होतं की, सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले आहेत. माझ्याच मृत्यूची बातमी मलाच पहायला मिळावी अजून काय पाहिजे?अशा शब्दात अभिजीतने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“तुम्ही प्रेम करता म्हणजे नक्की काय करता…?” ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘आरपार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

या अशा अफवा परसवणारी ही काही पहिलीच बातमी नव्हे. याआधीदेखील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी गेल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. हे सगळं पाहता एका अधिकृत वृत्तवाहिनीला मुलाखत देत सगळ्या अफवा आहेत. माझी तब्येत ठणठणीत असल्याचं देखील मोहन जोशी यांनी सांगितलं. एवढंच नाही तर स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अटकरीचं निधन झाल्याची देखील खोटी बातमी रिल्सच्या स्वरुपात व्हायरल होत होती. त्यामुळे प्रेक्षकांनी या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये असं प्रत्येक वेळी कलाकारांना सांगावं लागत आहे.

अभिजीत चव्हाणच्या कामाबाबत सांगायचं तर सध्या सुरु असलेल्य़ा मुरांबा मालिकेत या अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. मराठी सिनेमा तसंच मालिका आणि नाटकात देखील अभिजीतच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे.

ठरलं तर मग! मालिकेत झळकणार नवी पूर्णा आजी ? कोण आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री ?

Web Title: Actor abhijeet chavan lashes out at those spreading fake news about his death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • marathi actor
  • Marathi Television Show
  • priya marathe

संबंधित बातम्या

९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय ‘हा’ अभिनेता, झी मराठीची नवी मालिका ‘शुभ श्रावणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
1

९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय ‘हा’ अभिनेता, झी मराठीची नवी मालिका ‘शुभ श्रावणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

”..ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे”, अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला…
2

”..ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे”, अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला…

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं देखील आहे सिनेविश्वाची खास नातं
3

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं देखील आहे सिनेविश्वाची खास नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.