स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, ती मालिका म्हणजे ठरलं तर मग ! मराठी मालिका विश्वातील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरत आहे. साक्षी आणि प्रियाला मिळालेली शिक्षा असो किंवा प्रतीमाची स्मृती हळूहळू परत येणं असो मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढत गेला. काही दिवसांपूर्वीच मालिकेती पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. अन्नपूर्णा सुभेदार म्हणजेच पूर्णा आजीची भूमिका ज्योती चांदेकर या साकारत होत्या. सुभेदार कुटुंबातील ही पूर्णा आजी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. मालिकेती मुख्य पात्र साकारणाऱ्या सायली आणि अर्जुन इतकंत प्रेम पूर्णा आजी या व्य़क्तीरेखेवर देखील केलेलं आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत काही दिवस पूर्णा दाखवली नाही. पण म्हणतात ना द शो मस्ट गो ऑन तसंच आता पूर्णा आजीच्या भूमिकेबाबत दिसून येत आहे.
मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा नवा ट्विस्ट म्हणजे नव्य़ा पूर्णा आजीची होणारी एन्ट्री. आता ही नवी पूर्णा आजी कोण ? याबाबत प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर अशीही चर्चा आहे की, नव्या पूर्णा आजीच्या भूमिकेत अभिनेत्री स्वाती चिटणीस झळकणार आहे. ही चर्चा होण्यासाठी कारण देखील तसंच आहे. ‘तु ही रे माझा मितवा’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. स्वाती चिटणीस साकारत असलेली भूमिका आता अभिनेत्री वंदना पंडित साकारणार आहे. त्यामुळे आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील नवी पुर्णा आजी म्हणून स्वाती चिटणीस झळकणार का? असा सवाल प्रेक्षकांनी सोशल मीडियावर देखील व्यक्त केला आहे.
मात्र असं असलं तरी मालिकेत नव्या पूर्णा आजीची व्यक्तीरेखा कोण साकारणार आहे याबाबत ना स्टार प्रवाह वाहिनी ना मालिकेतील कोणत्या कलाकरांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे या फक्त सध्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे निदान अजूनतरी मालिकेतील नवी पूर्णा आजी कोण असणार याबाबात प्रश्नतचिन्हा कायम आहे. सध्या स्टार प्रवाहवरील दोन मालिका जोरदार गाजत आहेत. ते म्हणजे ‘तु ही रे माझा मितवा’ आणि ‘ठरलं तर मग’! या मालिकांना आणि कलाकरांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.