ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या ‘आरपार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Aarpar Marathi Movie News: मराठी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक दर्जेदार मराठी चित्रपट आलेत. यात काही रोमॅंटिक चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तसेच बदलत्या काळानुसार मराठी चित्रपटात काही फ्रेश जोडी सुद्धा पाहायला मिळत आहे. अशातच तरुणांची क्रश ऋता दुर्गुळे आणि हॅण्डसम हंक ललित प्रभाकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘आरपार’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत होती. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ठरलं तर मग! मालिकेत झळकणार नवी पूर्णा आजी ? कोण आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री ?
‘आरपार’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तर ऋता आणि ललितची जोडी हिट आहे. असे म्हंटले आहे. हा ट्रेलर 2 मिनिट 39 सेकंदाचा आहे. या ट्रेलरमध्ये ऋता आणि ललितचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र, यासोबतच त्यांच्यातील भांडण देखील दाखवण्यात आली आहे.
‘आरपार’मध्ये समर आणि प्राची या एकमेकांशिवाय राहू न शकणाऱ्या प्रेमीयुगुलाची कहाणी उलगडणार आहे. त्यांच्या नात्यात अपार प्रेम असूनही गैरसमज, वाद आणि दुरावा कायम आहे. या चित्रपटात त्यांच्या कुटुंबाचीही महत्त्वाची भूमिका आहे. एकमेकांना मॅनिफेस्ट करणारे समर-प्राची अखेर एकत्र येतील का, याचा निर्णय प्रेक्षकांना 12 सप्टेंबर रोजीच कळणार आहे.
‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज
हा चित्रपट येत्या 12 सेप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 12 सप्टेंबरच निवडण्यामागील कारण म्हणजे ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर या दोघांचाही वाढदिवस हा 12 सप्टेंबरला असतो