Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘बनवा बनवी’ नाटकाचा मुहूर्त; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गँगची रंगभूमीवर एन्ट्री

‘बनवा बनवी’ हे आगामी मराठी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या नाटकात इन्फ्लुएन्सर गँगची रंगभूमीवर एन्ट्री होणार आहे. हे इन्फ्लुएन्सर नक्की कोण आहेत? जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 09:41 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बनवा बनवी’ नाटक रंगभूमीवर
  • इन्फ्लुएन्सर गँगची रंगभूमीवर एन्ट्री
  • जाणून घ्या कोणते इन्फ्लुएन्सर सामील
 

मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा संगम साधत विविध विषय, शैली आणि सादरीकरणाच्या माध्यमातून नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच प्रयोगशीलतेला आणखी एक वेगळी दिशा देणारा नवा उपक्रम म्हणजे ‘बनवा बनवी’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आपल्या हटके कंटेंटने लोकप्रिय झालेली इन्फ्लुएन्सर गँग आता थेट रंगमंचावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रभात थिएटर्सच्या बॅनरखाली ‘लागली पैज’नंतर सादर होणारी ही दुसरी निर्मिती असून ‘बनवा बनवी’ या नावालाच एक वेगळी ओळख आणि कल्ट व्हॅल्यू आहे. या नाटकाचे निर्माते ज्योती प्रमोद कठापूरकर आणि निखिल एकनाथ करंडे आहेत, तर प्रियंका हेमंत जोगी सह-निर्मात्या म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. हर्षद प्रमोद कठापूरकर कार्यकारी प्रमुख म्हणून संपूर्ण निर्मितीची धुरा सांभाळत आहेत.

‘आम्ही नवा पैलू दिसेल’; Riteish Deshmukh ने ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर, म्हणाला ‘अभिमान…’

या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर खांडेकर यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडिया आणि रंगभूमी यांचा अनोखा मेळ घालत ही कथा उभी केली आहे. नाटकात शंतनू रांगणेकर, ऋषभ मोरे, सुमित चव्हाण, ओंकार कदम, सोनाली गुरव, सिद्धी पोतदार आणि सुधाकर सोनावणे ही सात जणांची टीम प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही संपूर्ण टीम आपल्या भन्नाट अभिनयाने आणि भन्नाट टाइमिंगने रंगमंचावर धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

नाटकाचे नेपथ्य डॉ. सुमित पाटील यांनी साकारले असून वेशभूषेची जबाबदारी चारूलता देशपांडे यांनी घेतली आहे. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात दृश्य आणि शैलीचा उत्तम मिलाफ पाहायला मिळणार आहे. या कलाकारांनी सोशल मीडियावर अल्प वेळेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असलं तरी, आता पूर्ण वेळ रंगमंचावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. “आम्ही फक्त काही मिनिटांचे कलाकार नाही, तर पूर्ण लांबीचं नाटक उचलण्याची ताकद आमच्यात आहे,” अशी भावना शंतनू रांगणेकर यांनी व्यक्त केली आहे.

Manish Malhotra Mother Dies: बॉलीवूडवर शोककळा! गुढीपाडव्याच्या दिवशीच मनिष मल्होत्राला मातृशोक

दिग्दर्शक समीर खांडेकर यांनी सांगितले की, त्यांचा नाटक आणि डिजिटल माध्यमांशी आधीपासूनच जवळचा संबंध आहे. इन्फ्लुएन्सर गँगमधील टॅलेंट ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या अभिनयाच्या आवडीला व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी हे नाटक लिहिले. प्रत्येक कलाकारामध्ये असलेल्या रंगभूमीच्या ओढीमुळेच ‘बनवा बनवी’ची निर्मिती शक्य झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. शेखर दाते या नाटकाचे सूत्रधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

मनोरंजन, विनोद आणि आधुनिकतेचा संगम असलेलं ‘बनवा बनवी’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि ताजातवाना अनुभव देण्यास सज्ज आहे. सोशल मीडिया ते रंगमंच असा प्रवास करणाऱ्या या टीमचा हा नवा प्रयोग प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Banva banvi marathi natak launch social media influencers make their debut on stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.