Tula Japnar Ahe Zee Marathi Serial : सध्या झी मराठी वाहिनीवरील कलाकारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच कारण म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड 2025. झी मराठी पुरस्कार सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पुरस्कारा सोहळ्याबाबत आणि मालिकेतील भुमिकेबाबात अभिनेते मनोज कोल्हटकरांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले होते.
हिंदीप्रमाणेच आता मराठी मालिकाविश्वात देखील हॉरर सस्पेन्स अशा मालिका येत आहेत. त्यातलीत सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असलेली मालिका म्हणजे “तुला जपणार आहे”. या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. काळी जादू, भूत , आत्मा, अदृश्य शक्ती याबाबत मालिकेचं कथानक असून दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचताना दिसते. या मालिकेतील अंबा आणि मीरा यांच्याबरोबरीने महत्वाची व्यक्तिरेखा ती म्हणजे शिवनाथ. रस्त्यावर राहणाऱ्या या शिवनाथला विद्या प्राप्त असते. त्यामुळे भूत प्रेत आणि आत्मा याबाबत ज्या सर्वसामान्य कळत नाही ते शिवनाथला कळतं. शिवनाथच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकवर्गाने मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली आहे. मालिकेतील या भूमिकेबाबत मनोज कोल्हटकरांनी अनेक किस्से सांगितले आहेत.
शिवनाथची भूमिका जेव्हा विचारण्यात आली त्यानंतर 12 ते 13 वेळा या भूमिकेसाठी मी लुकटेस्ट दिली आहे, असं मनोज कोल्हटकर यांनी सांगितलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की सतत होणाऱ्या लुक टेस्टला मी कंटाळलो. इतका वेळ जर लुक टेस्टला जात असेल तर मग भूमिकेचा अभ्यास करायचा कधी असे अनेक प्रश्न पडले होते. निर्माते आणि दिग्दर्शक शिवनाथच्य़ा लुकवर जे काही प्रयोग करता येतील ते सगळे करत होते.
मी तेव्हा कंटाळलो खरं पण आता कळतंय की ते किती महत्वाचं होतं. त्यावेळी त्यांनी लुकबाबत इतका बारकाईने विचार केला त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळ्या विषयाची मालिका असल्याने ही मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे. खूप वर्षानंतर मराठीत वेगळ्या धाटणीची भूमिका साकारायला मिळाली त्याबद्दल आनंद वाटतो. त्याचशिवाय याआधी देखील जानूच्या बाबाला लोकांनी डोकांनी डोक्यावर घेतलेलं आणि होणार सून मी ह्या घरची आणि आता तुला जपणार आहे मधला शिवनाथ म्हणजेच अंबा आणि मीराचे वडिल या भूमिकेला देखील प्रेक्षक तेवढंच प्रेम देत असून दोन्ही मालिका या झी मराठी वाहिनीवरच्य़ाच आहेत याचा आनंद वाटतो.
शिवनाथच्या भूमिकेचा किस्सा सांगताना अभिनेत्याने सांगितलं की, पहिल्या दिवशी मेकअप करुन आल्यावर मला सेटवर कोणी ओळखलंच नव्हतं. आमच्या स्पॉटबॉयने देखील माझ्याकडे दुर्लक्ष केलं की, असेल कोणीतरी असं. कित्येक वेळ मी शिवनाथच्या गेटअपमध्ये होतो पण युनिटच्या एकाही व्यक्तीला मला ओळखला आलं नाही. ती आठवण अत्यंत मजेशीर होती असं मनोज कोल्हटकरांनी सांगितलं.