Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पास्ताच्या एका बाऊलवरून पेटलेला संघर्ष! ‘तो ती आणि फुजी’तील ‘त्या’ सीनबद्दल Lalit Prabhakar ने केला खास खुलासा

चित्रपटातील एका प्रसंगाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या दृश्यात एका साध्या कारणावरून नात्यात निर्माण होणारा तणाव आणि ते टोकाला कसे पोहोचते, याचे वास्तववादी चित्रण दाखवण्यात आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 17, 2026 | 05:43 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट अलीकडेच Sony LIV वर प्रदर्शित झाला आहे.जपानमधील सुंदर निसर्गदृश्यांमुळे या चित्रपटाचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर घरगुती आणि शांत प्रसंगांमुळेही तो प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.चित्रपटातील एका प्रसंगाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या दृश्यात एका साध्या कारणावरून नात्यात निर्माण होणारा तणाव आणि ते टोकाला कसे पोहोचते, याचे वास्तववादी चित्रण दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रसंग प्रेक्षकांमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे.

तो प्रसंग एका तणावपूर्ण सायंकाळी घडतो, जिथे मुख्य अभिनेत्री कामावरून थकली-भागलेली घरी येते. तिला रात्रीच्या जेवणात पास्ता बनवून देण्याचे वचन दिलेले असते, पण ते तयार नसल्याचे तिला समजते. तिने स्वतः बनवलेला पास्ता अभिनेता त्याच्या निष्काळजीपणामुळे खाली सांडतो तेव्‍हा तिचा राग अनावर होतो. तिला आधार देण्याऐवजी किंवा आपली चूक मान्य करण्याऐवजी तो स्वतःचा बचाव करण्यासाठी वाद घालू लागतो. या प्रसंगामधून त्या दोघांमधील संवादाची कमतरता आणि जबाबदाऱ्यांचे असमान वाटप असल्‍याचे स्‍पष्टपणे दिसून येते.

ललित प्रभाकर यांच्‍यासाठी आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या पात्राची भूमिका साकारणे, हे सर्जनशील आव्हान आणि शिकण्याचा अनुभव दोन्ही होते. या प्रसंगाबद्दल सांगताना ते म्‍हणाले, “पास्ताचा तो प्रसंग चित्रपटातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक होता, कारण त्‍या क्षणामधून दिसून येते की एकमेकांवर प्रेम करणारे दोन व्‍यक्ती देखील आपल्या जोडीदाराला दुखावणारे शब्द बोलू शकतात किंवा तसे वागू शकतात. माझ्या भूमिकेचे त्याच्या वडिलांसोबतचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा आहे,

200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात Jacqueline Fernandez सरकारी साक्षीदार होणार? कोर्टाची ईडीला नोटीस

पण एका सुरक्षित वातावरणातून आल्यामुळे ते नेमके कसे करायचे हे त्याला समजत नाही. या प्रसंगातही त्याला तिची मनापासून काळजी आहे, म्हणून त्याने घर स्वच्छ केले आहे. पण पास्ता खाली सांडतो, तेव्हा तिच्या रागाचा उद्रेक का झाला, हे समजून घेण्यात तो कमी पडतो. उलट, ती संवादादरम्यान मुद्दाम त्याच्या वडिलांचा विषय काढते, तेव्हा तो दुखावला जातो. ते दोघेही वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर एकमेकांवर असलेला दबाव ओळखण्यात अपयशी ठरतात. या सीनच्‍या शूटिंगने मला त्या संवादातील दरीवर विचार करायला लावले, जी अनेक जोडपी अनुभवतात पण त्याबद्दल बोलत नाहीत. त्या बंदिस्त जागेत तिचा थकवा आणि त्याचा बचावात्मक पवित्रा यांमधील विरोधाभास स्पष्टपणे जाणवतो.” रोचक बाब म्‍हणजे, ललित यांचे खऱ्या आयुष्यातील स्वयंपाकासोबतचे नाते त्‍यांच्या भूमिकेपेक्षा अगदी वेगळे आहे. स्वतःला ते प्रोफेशनल मानत नसले तरी स्वयंपाक करणे ही त्‍यांच्यासाठी केवळ एक घरगुती जबाबदारी नसून मनःशांती देणारी आणि एकाग्रता वाढवणारी क्रिया आहे.

Bhooth Bangla Cast Fees: Akshay Kumar ची मोठी ‘डील’ तर राजपाल यादवने घेतली ‘इतकी’ फी! मानधनाची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा

‘तो ती आणि फुजी’ हा मोहित टाकळकर दिग्दर्शित चित्रपट प्रादेशिक सिनेमासाठी एक महत्त्वपूर्ण भर मानला जात आहे. या चित्रपटाची कथा Mrinmayee Godbole आणि Lalit Prabhakar यांनी साकारलेल्या दोन पात्रांच्या नात्यावर आधारित आहे. एकेकाळी ते एकमेकांच्या प्रेमात होते, मात्र काळाच्या ओघात वाढलेल्या अपेक्षा आणि भावनिक दुराव्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होतो.अनेक वर्षांनंतर जपानमध्ये त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीत त्यांना जुन्या, न सुटलेल्या भावना आणि पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेचा सामना करावा लागतो. ही भावनिक आणि वास्तववादी कथा प्रेक्षकांना खोलवर भिडणारी ठरते.

Web Title: Lalit prabhakar reveals details about that intense scene in to ti ani fuji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण
1

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
2

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
3

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
4

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.