(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी सिनेइंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. परंतु आता याचदरम्यान आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसाठी समोर आली आहे. आता नुकताच त्यांना समता परिषद या संस्थेतर्फे २०२४ सालचा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या बातमीने चाहत्यांना चकित केले आहे. या पुरस्काराचा स्वीकार करताना नागराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि एक प्रसंगही शेअर केला. हा प्रसंग सांगतात ते भावुक होताना दिसले. त्यांनी सांगितले की, घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यावरून वडिलांसोबत भांडण झाले होते, हा प्रसंग सांगताना ते भावुक दिसले.
Pushpa 2 Advance Booking: ‘पुष्पा 2’ ने रिलीजपूर्वी या 5 सुपरहिट चित्रपटांचे तोडले रेकॉर्ड!
काय म्हणाले नागराज मंजुळे?
हा पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले की, ‘मी आधी विचित्र वेड्यावाकड्या वाढलेला मुलगा होतो. माझ्या आयुष्यात अंधश्रद्धा, भांडण, व्यसनं याशिवाय काही नव्हते. माझे वडील आता या जगात नाहीत. परंतु माझी आई इथे आहे. माझ्या आईला वडिलांची सतत आठवण येत असते. माझे वडील दगड फोडायच काम करत असे तसेच ते घर बांधकामाचं काम करत होते. त्यांना महापुरुषांशी काही देणंघेणं नव्हते. त्यांचे छोटे छोटे देव घरात होते, असे नागराज मंजुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच नागराज मंजुळे पुढे म्हणाले की, ‘त्यांची आपापली समज, अंधश्रद्धा होती, अशा घरात माझा जन्म झाला होता. कळायला लागले तेव्हा मी विचार बदलण्यासाठी घरात भांडायचो, आईने हे सगळं पहिले आहे, ती या सगळ्या प्रसंगाची साक्षीदार आहे.’ असे ते म्हणाले. नागराज मंजुळे देखील त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आनंदी झाली आहेत.
कामाच्या आघाडीवर, मराठी चित्रपसृष्टीतील यासोबतच बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. हा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसत होती. मात्र हा चित्रपट आता वादात अडकला असून पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवल्याची बातमी समोर आली आहे. या चित्रपटबाबत कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे समन्स बजवण्यात आले होते. परंतु या प्रकरणा बाबतची माहिती अद्यापही समोर आलेले नाही.